सेक्स करताना तरुण का करत नाहीत कंडोमचा वापर ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे सेक्सबाबतीत सर्वत्र एवढी जागरूकता होताना दिसत आहे तरीसुद्धा आजकाल तरुणांमध्ये बेजबाबदारपणा असल्याचे चित्र दिसत आहे. लैंगिक आजारांपासून आणि गर्भधारणा होण्यापासून बचाव करण्यासाठी कंडोम हा एक उत्तम पर्याय आहे. पंरतु तरी देखील याच्या वापराकडे तरुण दुर्लक्ष करताना दिसत आहेत. कंडोमचा वापर करण्याबाबत तरुणांंमध्ये ५२ टक्के कमतरता असल्याचे thehealthsite.com ने दिलेल्या वृत्तानुसार समोर आले आहे.

कंडोमचा वपार न करण्याचे कारण
thehealthsite.com ने दिलेल्या माहितीनुसार, अनेक तरुणांना सेक्स करताना कंडोम म्हणजे अडथळा वाटतो. सेक्स करताना यामुळे सहजता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंडोममुळे सेक्सची फीलींग येत नाही आणि नीट एन्जाॅय करता येत नाही असे त्यांचे मत आहे. त्यांचा असा समज आहे की, कंडोमचा वापर करणे म्हणजे केवळ गर्भधारणा टाळणे हाच आहे. आणि असेल तर यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकराच्या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे ते कंडोमचा वापर करणे टाळतात.

भरमसाठ जाहिराती करुनही तरुणांमध्ये जागरुकता नाही
टीव्ही, वर्तमानपत्रे, बॅनर्स, होर्डिंग्स इतकेच नाही तर सोशल मीडियावरूनही कंडोमच्या जाहिराती आणि कंडोमच्या वापराविषयी जागरुकता होताना पाहायला मिळते. एवढी भरमसाठ जाहिरात करूनही तरुणांमध्ये कंडोमबाबत जागरुकता कमी असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला कंडोम एक प्रकारचे होते. आता मात्र त्यात विविधता असल्याचे दिसत आहे. अचानक झालेल्या सेक्सवेळी तरुण कंडोमला घेऊन फारच बेजबाबदारपणे वागतात. त्याबद्दल काही तरुणांचं असं म्हणणं आहे की, प्रत्येक वेळी कंडोम घेऊन फिरू शकत नाहीत. त्यामुळे जसे आहे तसे काम चालवावे लागते असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु लैंगिक आजार आणि गर्भधारणेचं काय असा सवालही यावेळी उपस्थित होताना दिसत आहे.

‘कंडोमचा वापर म्हणजे भित्रेपणाचं लक्षण’
कंडोमचा वापर न करणे हा एक ट्रेंड झाला आहे. कंडोम वापरल्याने पुरुषार्थ कमी होण्याची भावना तर मनात येत नाही ना असं त्यांना विचारलं असता तरुणाईचं उत्तर असतं की, ‘कंडोम वापरणे हे सुरक्षेसाठी असतं. पण आता सुरक्षेसाठी आणखीही वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ते कंडोम वापरत नाहीत. पण असं अजिबात नाही की, कंडोमचा वापर केल्याने त्यांचा पुरूषार्थ कमी होतो किंवा त्यांच्यात हीनता येते. परंतु जेव्हा कधी कंडोमचा वापर केला जातो तेव्हा असं वाटतं की, आम्ही थोडे घाबरत आहोत.’ सरक्षेचा प्रश्न असेल तर त्यासाठी इतरही पर्याय आहेत असे त्यांचे मत आहे.

महिलांचे दुर्लक्ष
अनेकदा कंडोम न वापरणे याकडे महिलांकडूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे तरुणांकडूनही जास्त काळजी घेतली जात नाही. कारण महिलांनाही आता माहिती आहे की, आयपिल घेतल्याने गर्भधारणा टाळता येऊ शकते. त्यामुळे त्या कंडोमचा वापर करणे गरजेचं समजत नाहीत. दरम्यान समोर आलेल्या रिपोर्टनुसार, कंडोमच्या वापरात कमतरता आल्या कारणाने गेल्या ८ वर्षात देशभरात गर्भपात करण्यातही दुप्पट वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये प्रीमॅरिटल प्रेग्नेंसीमध्ये फार वाढ झाल्याचे दिसत आहे.

प्रेग्नेंसी ट्यूबचं होतं नुकसान
अनेकदा महिलांमध्ये जागरूकता वाढल्या कारणाने त्या डाॅक्टरांकडे जाणेही टाळतात. त्या परस्पर औषधे घेतात आणि नको असलेली गर्भधारणा टाळतात. परंतु असे करणे हे त्यांच्यासाठी फारच नुकसानदायक ठरू शकते. आयपीलचे अनेक साईड इफेक्ट होतात. आयपिलचा सर्वात मोठा साइड इफेक्ट हा असतो की, ही प्रेग्नेंसी ट्यूबमध्ये अडकून राहते. याने प्रेग्नेंसी ट्यूबचं नुकसान होतं.
You might also like