लोकसभेची रणधुमाळी : राष्ट्रीय महाघाडीसाठी शरद पवारांची चाणक्यनीती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सारखा बलाढ्य राजकारणी रोखण्याची ताकद काँग्रेसच्या नेत्यात नाही म्हणून शरद पवार यांना सध्या काँग्रेसने आपला गुरु द्रोणाचार्य बनवले आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी म्हणजे ६ जनपथवर सध्या गाड्यांची सारखी वर्दळ असते. शरद पवार महाआघाडीच्या संघटन बांधणीचा मास्टर प्लॅन बनवत आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे राहुल गांधी हि सतत शरद पवार यांच्या घरी येत असतात. मात्र या सर्व घडामोडीतून, काँग्रेसच्या कोत्या नेतृत्वाला मोदींना रोखण्यासाठी शरद पवार यांचीच आवश्यकता का पडते असे विचारले जाऊ लागले आहे.

शरद पवार यांच्यात संघटन बांधणीची चांगलीच किमया आहे. त्यांच्या या किमयेमुळेच त्यांना राहुल गांधी यांनी जवळ केले आहे. शरद पवारांच्या राजकीय किमयेवर उदाहरणा दाखल बोलायचे झाले तर शरद पवार यांनी केजरीवाल आणि राहुल गांधी यांना एकाच मंचावर एकत्रित आणण्यात यश मिळवले आहे. ये फक्त शरद पवारच करू शकतात. मात्र भाजपने हाच मुद्दा पकडून अरविंद केजरीवाल यांना टीकेचे लक्ष देखील केले आहे.

चंद्राबाबू नायडू आंदोलनासाठी दिल्लीत आले कि शरद पवार यांनाच भेटता. ममता बॅनर्जी हि शरद पवार यांचा शब्द मोडत नाहीत. या दोन धुरंदर नेत्यांना महाआघाडीच्या संघटनात गोवण्याची किमया फक्त शरद पवारच करू शकतात. अशा काही अलौकिक राजकीय कसबामुळे शरद पवार हे राहुल गांधींनी हवेहवेशे वाटू लागले आहेत. मात्र शरद पवारांच्या चाणक्य नीतीला वापरून राहुल गांधी पंतप्रधान होणे हे शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाला साजेशे नाही.