लघवी दाबून ठेवल्याने शरीर का करते ‘या’ हालचाली, जाणून घ्या 6 महत्वाच्या गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लघवीला जोरात लागली असताना काहीजण ती दाबून ठेवतात, आणि लघवीला जाणे टाळतात. यापाठीमागे काही कारण असले तरी असे करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. त्याचे विविध परिणाम शरीरावर दिसून येतात. जोरात लागलेल्या लघवीकडे दुर्लक्ष करण्यासाठी काहीजण लक्ष दुसरीकडे वळवतात, पाय एकमेकांत गुंतवतात, अंगविक्षेप करतात, असे विचित्र प्रकार आपोआप होतात, परंतु हे धोकादायक ठरू शकते.

हे लक्षात ठेवा
1. लघवी करणे ही नैसर्गिक क्रिया असून त्याद्वारे किडनी शरीरारातील टॉक्सिन्स बाहेर टाकते. त्यामुळे या क्रियेवर फार काळ आवर घालणे योग्य नाही आणि ते शक्यही नाही. दिवसातून 6 ते 8 वेळा वॉशरुमला जाणे सामान्य आहे. जास्त पाणी पिणारे जास्त वेळाही जाऊ शकतात.

2. कितीवेळा लघवीला जावे यावर काही कंट्रोल नाही. परंतु ही क्रिया रोखल्यास दबाव वाढतो. अशावेळी काहीजण उड्यादेखील मारतात. कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे अंगविक्षेप करतात.

3. शरीराला एखादी महत्वाची क्रिया करायची असते आणि आणि ती क्रिया करू शकत नसल्याने शरीर रिद्मिक डिस्प्लेसमेंट बिहेविअर करु लागते. असे वागण्याच्या माध्यमातून आपण एंगजायटी (दबाव) दूर करण्याचा प्रयत्न करत असतो.

4. जोरात लघवी लागली असताना आणि ही क्रिया करायला न मिळाल्यास अनेकजण डोकं खाजवतात किंवा नखं खातात. यालाच रिद्मिक डिस्प्लेसमेंट बिहेविअर म्हणतात. लघवी करता येत नसल्याने शरीर यातून डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली करते.

5. लघवी लागलेली असताना त्यावरुन मेंदूचे लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न करणे यास थिअरी ऑफ डिस्ट्रॅक्शन म्हणतात. मेंदूचे एखाद्या गोष्टीवरुन लक्ष हटवण्यासाठी आपण दुसरीकडे लक्ष केंद्रीत करु लागतो. यामु शरीर विचित्र अंविक्षेप करते.

6. उड्या मारणे, पायात पाय गुंतवणे किंवा डान्स करणे या प्रकारामुळे ब्लेडरवर दबाव वाढतो. यामुळे लघवीचा प्रवाह सुद्धा वाढतो, ज्यावर तुम्ही कंट्रोल करु शकत नाही.