मला चंपा आणि फडणवीसांना टरबूज म्हणता त्याचं काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप ( BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटलांनी ही टीका केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही तितकेच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. यावेळी स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले की, टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र, तुम्ही मोदींवर, अमित शाहंवर बोललेले चालते.

तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक टीका केली होती. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. पवार साहेबांबाबत बोलण्याएवढी आपली किंमत आहे का, असा टोला लगावला होता.

दरम्यान, अजित पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनीदेखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये. तुम्ही निखारा टाकलात तर आम्ही वणवा पेटवू, अशी टीका करत चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये पदवीधर मतदारसंघात प्रचारावेळी ते बोलत होते. शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते आहेत, राजकारणात येण्यापूर्वी ते मला मोठे नेते वाटायचे. मात्र, प्रत्यक्षात ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यानंतर विविध नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

You might also like