पीरियड्समधील ‘या’ चुकांमुळे वाढू शकते 2 ते 3 किलो वजन, ‘हे’ आहेत उपाय, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – शरीर बोजड झालंय आणि वजन वाढलंय असं महिन्यातील पीरियडच्या आसपासच्या दिवसांत जाणवत असेल तर घाबरण्याची किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण असे अनेक महिलांच्या बाबतीत घडते. पीरियड्स दरम्यान वजन वाढणे ही सामान्य बाब समजली जाते. हे वजन का वाढते यामागील कारण जाणून घेऊ आणि त्यावर कोणते उपाय आहेत तेदेखील जाणून घेवूयात…

ही आहेत वजन वाढण्याची कारणे
यामागील मुख्य कारण वॉटर रिटेंशन आहे. एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन नावाच्या हार्मोन्समुळे ही समस्या जाणवते. हार्मोन्सची पातळी कमी होणं शरीराला संदेश देते की पीरियड्स येण्याचा दिवस जवळ आला आहे. वॉटर रिटेंशनच्या समस्येमुळे नेहमीच स्तनांमध्ये व पोटात सूज निर्माण होते. त्यामुळे पीरियड्स दरम्यान वजन वाढते. हे फॅट नसून शरीरातील वाढलेलं पाणी असते. पीरियड्सचे 5 दिवस गेले कीख दोन्ही हार्मोन्स सामान्य पातळीवर परत येतात आणि वजन पुन्हा पहिल्यासारखे होते.

वजन वाढण्यामागची इतर कारणे
प्रोजेस्टेरोनच्या पातळीत कमतरता झाल्यामुळे मासिक पाळी दरम्यान अनहेल्दी व अतिप्रमाणात काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी महिला जे समोर दिसेल ते खात सुटतात. हाय शुगर किंवा हाय फॅट असलेले पदार्थ सतत खाल्यामुळे शरीरात कॅलरीजचा पातळी वाढते आणि वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. अनेक महिलांचे पीरियड्स दरम्यान 2 ते 3 किलो वजन वाढते.

वजन वाढीची लक्षणे
मासिक पाळी येण्याआधी व आल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, पाठीत, पोठात, कंबरेत व संपूर्ण शरीरात असह्य वेदना होणे, प्रचंड थकवा, त्वचेचा समस्या, तहान व भूकेत मोठे बदल होणे, स्तनांमध्ये सूज व वेदना, औदासिन्य, जीव घाबराघुबरा होणं, चिडचिड, आसपासच्या लोकांचा त्रास होणं, झोप न येणे अशी लक्षणे दिसतात.

वजन कमी करण्यासाठी उपाय
* योग व एक्सरसाइजची मदत घ्यावी लागेल.
* पीरियड्सच्या दरम्यान आठवडाभर शक्य तितके भरपूर पाणी प्या.
* फायबरयुक्त पदार्थ खा.
* या काळात मीठाच्या सेवनापासून शक्य तितके दूर राहा.
* पीरियड्स दरम्यान हलक्या एक्सरसाइज करा.