जन्म झाल्यानंतर लगेच किंवा 24 तासाच्या आत बाळाचं रडणं गरजेचं का असतं ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   असं म्हटलं जातं की , बाळ जन्माला आल्यानंतर त्यानं लगेच रडलं पाहिजे. जन्मल्यानंतर जरी बाळ रडलं नाही तर किमान 24 तासाच्या आत ते रडलं पाहिजे. याचं कारण अनेकांना माहिती नाही. तुम्हालाही हा प्रश्न पडलाच असेल. यासंदर्भात आज आपण माहिती घेऊयात.

बाळ जन्माला आल्यानंतर ते जर रडत असेल तर त्याचं फुप्फुस आणि हार्ट नीटम काम करत आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या रडण्यानं त्याच्या आरोग्याबद्दल समजतं. जर बाळ जोरात रडत असेल तर त्याचं आरोग्य उत्तम आहे जर रडण्याचा आवाज लहान असेल तर बाळाला काही शारीरिक समस्या असण्याचीही शक्यता असते.

बाळ जन्माला येण्याआधी ते गर्भनळीच्या माध्यमातून श्वास घेत असतं. जन्मानंतर काही सेकंदांनी ते स्वत:चा श्वास घेऊ लागतं. बाळ श्वास घेत असताना त्यांच्या तोंडातून आणि नाकातून तरल पदार्थ बाहेर येत असतो. या प्रक्रियेदरम्यान बाळ रडतं. जेव्हा ते श्वास घेण्यास सक्षम नसते तेव्हा हा तरल पदार्थ बाहेर येत नाही आणि बाळ रडतही नाही. यावेळी डॉक्टर सेक्शन ट्युबची मदत घेतात.

तज्ज्ञांच्या मते 24 तासांमधून बाळाचं 2-3 तास रडणं सामान्य आहे. परंतु बाळ जर 4 तासांपेक्षा जास्त रड असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. जसं बाळाचं वय वाढतं तसं त्याचं रडण्याचं प्रमाण कमी होतं.