संध्याकाळी वॉक करणे चांगले की वाईट ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण प्रवास गाडी किंवा बस ने करतो. कधीकधी कामासाठी वाॅकींग ही होते पण कधीतरी वेळ काढून संध्याकाळी वाॅक करायला जातो का ? सध्या वाढत्या तापमानात थोडे वाॅक करणे देखिल महत्वाचे आहे. अनेकजण आपल्या कामातून थोडा वेळ सकाळी वाॅक करण्यासाठी देतात. अशा वेळी तापमानाचे प्रमाण वाढल्याने काहींना जाणे शक्य होत नाही. सायंकाळी थोडेसे गरम थोडे थंड अशा वातावरणात चालण्याची मजा वेगळी असते. म्हणून संध्याकाळी वॉक करणे फायदेशिर ठरते. ते कसे ? यासाठी जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी

वातावरणातील वाढता उकाडा वाढल्यामुळे सकाळी वॉकसाठी जाणं नकोसं वाटतं. अशातच उन्हाळ्यामध्ये सकाळी वॉक घेण्याऐवजी संध्याकाळी वॉक घेणं जास्त सोयीस्कर असते. काहीवेळा दिवसभराच्या कामामुळे आपण खुप थकून जातो त्यामुळे तुम्हाला जर व्यायाम करणे शक्य नसेल तर तुम्ही वॉक करू शकता. यामुळे तुम्ही स्वतःला अगदी फिट ठेवू शकता. एवढचं नाही तर यामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते. तुम्हाला आराम देखिल मिळतो.

दिवसभर कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. संध्याकाळी जर थोडे वाॅक केले तर तुमच्या शरीराला आणि मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे कमीत कमी अर्ध्या तास संध्याकाळच्या वेळी वॉक करणे आवश्यक असते. शांत झोप मिळण्यासाठी देखिल संध्याकाळी घेतलेला वॉक फार फायदेशीर ठरतो. कारण यामुळे तुमचा दिवसभराचा तणाव कमी होतो. त्याचबराेबर पचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील सर्व अवयवांचा आराम होतो. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यासाठी मदत होते.