‘टार्गेट’ करण्यासाठी सगळ्यांना सावरकरच का सापडतात ? शरद पोक्षेंचा सवाल

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात सावरकरांविषयी काहीना काही सतत पसरवले जात आहे. जाणीवपूर्वक सावरकरांविषयी काहीना काही पसवण्यासाठी एक यंत्रणा राबली जात आहे. याबाबतचा शोध घेत असताना डोक्यात विचार आला की, असे आंबेडकर आणि फुलेंच्या विरोधात करेल का ? टार्गेट करायला प्रत्येकाला सावरकरच का सापडतात. असा सवाल प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. पिंपरी चिचवड येते आयोजीत स्वरंगधर्व संगीत महोत्सवात त्यांनी हा सवाल आज उपस्थित केला.

दिल्लीत एका मुलामुळे सावरकर हा शब्द पुन्हा चर्चेत आला आहे. ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहित नाही त्याला सावरकरांचा इतिहास माहित असण्याची अपेक्षा करणे हे चुकीचे असल्याचे देखील शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितले. भारतामध्य सावरकर हा शब्द दिल्लीतील एका मूर्ख मुलामुळे फार चर्चेत आला आहे. मी त्या मुलाचा आभारी आहे. त्याने दर एक दीड महिन्यांनी अशी काही वक्तव्ये केली की त्यामुळे सावरकर चर्चेत राहीले. अशी वक्तव्ये करत रहावीत जेणेकरून प्रत्येक हिंदू माणसाच्या आतील सावरकर जागे होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सावरकरांचा फोटो असलेलं पहिल टपाल तिकीट छापलं होतं. दादरमध्ये शिवाजी पार्कच्या समोर सावरकरांचे राष्ट्रीय स्मारक उभं राहिलं. तेव्हा त्यांनी स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यातून 15 हजार रुपये ते स्मारक उभारणीसाठी दिले होते. त्यामुळे सावरकर यांची किंमत इंदिरा गांधी यांना माहीत होती असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सावरकर हे ब्राह्मण होते, त्यांचा अपमान केला म्हणून चार ब्राह्मण रस्त्यावर उतरले. किंवा त्यांनी निषेध नोंदवला आहे, असे आजपर्यंत पाहिले नाही. ज्यांनी एका ब्राह्मण नावाच्या चौकटीत बांधलं गेलं, त्या माणसाने कधीही जात मानली नाही. त्यांनी एकच जात मानली ती म्हणेज हिंदू सावरकर हे हिंदुत्ववादी, सावरकर यांचा हिंदुत्ववाद आपण आजपर्य़ंत जाणून घेतला नाही. त्यामुळे जो तो येतो आणि त्यांच्या बद्दल वक्तव्य करतो, असा टोला शरद पोंक्षे यांनी लगावला.