चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोठी का होतात ? कसे दूर कराल याचे डाग ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : चेहऱ्यावरील त्वचेचे पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठी होत असतात. असं का होतं हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तसं तर ही रोमछिद्रे आपोआप उघडून मोठी आणि बंद होत असतात. त्वचेचा हा खास लवचिकपणाचा गुण असतो. जर तुम्ही जास्त केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले किंवा जास्त प्रदूषणामुळं त्वचेचा हा लवचिकपणा त्वचा गमावून बसते. अशात चेहऱ्यावरील ही रोमछिद्रे उघडली तर जातात. परंतु बंद मात्र होत नाहीत.

अशात ही रोमछिद्रे मोठी होतात आणि या लुकमुळं तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. जर हे पोर्स नियमितपणे असे उघडे राहिले तर चेहऱ्यावर पिंपल्सही येतात. अनेकदा महिला मेकअपच्या मदतीनं हे पोर्स लपवतात. परंतु हा उपाय म्हणजे तात्पुरता उपाय आहे. जर तुम्हाला कायमस्वरूपी ही समस्या दूर करायची असेल तर यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) रोमछिद्रांची स्वच्छता – जेव्हा त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये धूळ, माती बॅक्टेरिया जमा होत असतात तेव्हा त्यावर सूज दिसू लागते. यामुळं चेहऱ्यावरील पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठी दिसू लागतात. रोमछिद्रांमध्ये जर काही जमा झालं असेल तर ते बंद होत नाहीत. त्यामुळं रोमछिद्रांची स्वच्छता ही खूप गरजेची आहे.

2) पपई फेस पॅक – यासाठी पपईची पेस्ट घ्या. यात मध आणि कच्चं दूध मिक्स करून पेस्ट तयार करा. आता तयार झालेला पॅक नीट चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटे हा पॅक ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि चेहरा तजेलदार दिसेल. याशिवाय तुमची रोमछिद्रेही लहान झालेली दिसतील.

3) गुलाब जल – त्वचेची रोमछिद्रे बंद किंवा स्वच्छ करण्यासाठी गुलाब जलचा खूप फायदा होतो. यासाठी अर्धा चमचा चंदन पावडर गुलाब जलमध्ये मिक्स करा. आता यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आता हे तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा. 5 मिनिटांनंतर चेहरा नॉर्मल पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. यानं रोमछिद्रांची समस्या बरीच कमी झालेली तुम्हाला दिसेल.

4) दही – दह्यात असणारं लॅक्टीक अॅसिड हे रोमछिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, तेल, बॅक्टेरिया यांना दूर करतं. यामुळं मोठी आणि उघडलेली रोमछिद्रे बंद होतात. यासाठी एक चमचा किंवा गरजेनुसार दही घ्या आणि ते चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनंतर एका ओल्या टॉवेलनं चेहरा स्वच्छ करा आणि नंतर पाण्यानं धुवून घ्या. दही तुमच्या त्वचेवर अँटी एजिंगसारखं काम करतं. लॅक्टीक ॲसिडमध्ये हेल्दी बॅक्टेरिया आढळतात. यामुळं त्वचेचा रंग खुलतो. यामुळं सुरकुत्या येत नाहीत.

5) टोमॅटोचा रस – टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून काही वेळ हलक्या हातानं मसाज करा. हा उपाय आठवड्यातून 2 वेळा करा. यानं त्वचेची उघडलेली रोमछिद्रे बंद होतील. इतकंच नाही टोमॅटोमुळं चेहऱ्यावर ग्लोदेखील येईल. तुमच्या त्वचेला पोषणही मिळेल.

काय करू नये ?
अनेक महिला रोमछिद्रे लपवण्यासाठी मेकअपची मदत घेतात. परंतु तुम्ही जास्त मेकअप केला तर ही रोमछिद्रे आणखी मोठी होतील. म्हणून चेहऱ्याची नियमितपणे स्वच्छता करा. केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घुरगुती उपाय कधीही उत्तम आहेत.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.