तर मग संपूर्ण देशात गो हत्या बंदी लागू का नाही ? ‘सावरकर’ मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना ‘सवाल’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपुरात सुरु असलेल्या विधानसभेच्या चवथ्या दिवसाला आज सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेत सभागृहात चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. सावरकरांच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला तुम्हाला सावरकरांचे संपूर्ण हिंदुत्व मान्य आहे का ? असा सवाल केला.

गेल्या काही दिवसांपासून सावरकरांच्या नावाचा मुद्दा चांगलाच गाजला होता यावर आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाष्य केले तुम्हाला सावरकरांचा हिंदुत्ववाद मान्य आहे का ? असा म्हणत जर मान्य असेल तर मग संपूर्ण देशात गो हत्या बंदी लागू का नाही असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आम्हाला सावरकर शिकवताना तुमच्यात कोणी सावरकर विरोधी तर नाही ना हे सुद्धा तपासून पहा असा सल्ला देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

आम्ही दिलेला शब्द पाळतो असे सांगत देश सध्या आर्थिक संकटात आहे असे देखील उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले, तसेच बिहारचा दाखल देत लालू प्रसाद यादव व नितीश कुमारांची जोडी भाजपने फोडली हे सांगत चालू संसार मोडायची भाजपला सवय असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

नागपुरात सुरु असलेल्या विधानसभेच्या चवथ्या दिवसाला आज सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे तीन चाकी सरकार आहे त्यामुळे जास्त काळ चालणार नाही अशी टीका या सरकारवर केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले हे गरिबांचे सरकार आहे आणि गरिबाला तीन चाकी रिक्षाच परवडते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सभागृहात चौफेर फटकेबाजी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/