फक्त 12 दिवसात 2750 रूपयांनी ‘महागलं’ सोनं, 40000 च्या जवळ प्रति ‘तोळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका-चीनच्या व्यापार युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव वाढले असून नागरिक सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यानंतर आता जगभरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा ३८ हजार रुपयांच्या पुढे गेला असून यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला देखील मंदी आली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र जाणकारांच्या माहितीनुसार या किमती कमी होण्याची सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसून लवकरच सोने ४० हजाराच्या पार जाईल.

१२ दिवसांत बदलली गणिते
मागील १२ दिवसांत सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास २८०० रुपये इतका भाव या दिवसांत वाढला आहे. या ऑगस्ट रोजी सोन्याचा दर हा ३५ हजार ७१० रुपये प्रति दहा तोळा होता. त्यानंतर सोमवारी १२ ऑगस्ट रोजी हा भाव ३८ हजार ४७० रुपये इतका झाला आहे.

या कारणांमुळे वाढतोय भाव
१)
सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
२) जगात राजकीय संकट गडद झाल्याने आणि अनिश्चितता असल्यामुळे
३) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याने सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.
४) जगातील अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने
५) कोणत्याही देशाच्या सेंट्रल बँकेने रेपोरेट मध्ये केलेल्या कपातींनंतर देखील सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील मागील ८ महिन्यात ४ वेळा हे दर कमी केल्याने भारतात सोन्याच्या दराने मोठी उडी घेतली आहे.

सोन्यात गुंतवणूक सगळ्यात सुरक्षित
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित असून यामध्ये उत्तम परतावा देखील मिळतो. जर तुम्ही जानेवारीत सोने खरेदी केले असेल तर तुम्हाला आता त्याचा १० टक्के इतका परतावा मिळाला असता. बँकेत एफडी आणि म्युच्युअल फंडापेक्षाहि जास्त परतावा सोन्यामध्ये मिळत असल्याने नागरिक जास्त प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात.

आरोग्यविषयक वृत्त