अर्जुन कपूर का लपवतोय चेहरा ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बी – टाऊनमधील सर्वात जास्त चर्चील्या जाणाऱ्या जोड्यांपैकी हॉट जोडी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांना वारंवार स्पॉट केले जात आहे. ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी देखील चर्चा सध्या बी टाऊनमध्ये आहे.

दरम्यान, अर्जुन कपूर सध्या त्याच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान अर्जुन कपूरचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे.  काल-परवा अर्जुन कपूर आशुतोष गोवारीकरच्या आॅफिसबाहेर दिसला. पण यावेळी रेड हुडी आणि ब्लॅक चष्मा घातलेल्या अर्जुनला ओळखणे कठीण होते. मीडियाला पाहताच त्याने आपला अख्खा चेहरा झाकून घेतला. आता असे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मलायकासोबत डेटवर जाण्यासाठी अर्जुनने हा सगळा खटाटोप केला असावा, असेही तुम्हाला वाटेल. पण असे नाहीय.

काय आहे कारण अर्जुनचा चेहरा लपवण्यामागे

आपल्या आगामी चित्रपटातील लूक जपण्यासाठी अभिनेते खूप प्रयत्न करीत असतात. आता अर्जुनच्या चेहरा लपवण्यामागचे कारण आहे, त्याचे नवे लूक होय, आपल्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चे शूटींग पूर्ण केल्यानंतर अर्जुन कपूर आशुतोष गोवारीकरणच्या ‘पानीपत’ या चित्रपटात दिसणार आहे.

यात अर्जुनचे लूक एकदम वेगळे असणार आहे. या चित्रपटासाठी अर्जुन मुंडण करणार असल्याचेही कळतेय. हे लूक लपवण्याचा निर्णय ‘पानीपत’च्या मेकर्सनी घेतला आहे. आता फक्त अर्जुन हे लूक कधीपर्यंत लपवतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
‘पानीपत’ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

तूर्तास अर्जुन कपूर त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या मलायका अरोराच्या प्रेमात वेडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. कालपरवा महीप कपूरने मलायका व अर्जुनचा एका पार्टीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत मलायका अर्जुनला अगदी बिलगुन बसलेली दिसली होती.

फडणवीस-ठाकरे भेट, दोघांमध्ये १५ ते २० मिनिटे चर्चा