…म्हणून हॉटेलमधील बेडवर असते ‘पांढऱ्या’ रंगाची चादर, जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून बाहेर फिरायला जायला प्रत्येकालाच आवडते. बाहेर फिरायला जायचे म्हटले की पहिला विचार येतो कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे, ते हॉटेल योग्य सुविधा पुरवेल का, आपल्या बजेटमध्ये असेल का असे अनेक विचार येतात. तुम्ही अनेकवेळा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल. मात्र या सर्व हॉटेलमध्ये एक गोष्ट एकसारखी असते. ती म्हणजे रुममध्ये वापरली जाणारी चादर. रुममध्ये पाढऱ्या रंगाची चादर वापरलेली असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का,की चारद पांढऱ्याच रंगाची का असते, इतर दुसऱ्या कोणत्याच रंगाची का नसते. तर यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. जाणून घ्या…

पांढऱ्या रंगाची चादर का ?

असे मानले जाते की, पांढरा रंग मनाला शांतता देतो. जितकी शांतता पांढरा रंग पाहून मिळते, तेवढी इतर रंग पाहून मिळत नाही, असे म्हटले जाते. चादरीचा रंग पांढरा असल्याने ती घाणेरडी झाल्यास लगेच दिसून येतात. त्यामुळे ती लगेच बदता येतात. एवढेच नाहीतर चुकीने जर एखादा डाग लागला असले तो लगेच दिसतो आणि चादर धुता येऊ शकते. अनेकदा लोक सुट्यांमध्ये आपला ट्रेस घालवण्यासाठी बाहेर फिरायला जातात. अशात त्यांना रिलॅक्स वाटावं म्हणून पांढऱ्या रंगाच्या चादरींचा वापर केला जातो.

हॉटेलमध्ये चादरी धुत नाहीत का ?

पांढऱ्या चादरी साफ करणे साफ करणे फार सोपे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसे. कारण आपण वापरत असलेला पांढरा शर्ट धुवून धुवून पिवळा पडतो. मग हॉटेलमधील चादरी पांढऱ्या कशा, त्या धुतल्या जात नाहीत का. तर याचे उत्तर आहे, हॉटेलमध्ये चादरी धुतल्या जात नाहीत. तर हॉटेलमधील चादरींना ब्लिच केले जाते. यामुळे चादरीवरील डाग निघून जातो शिवाय चादरीचा रंग देखील उडत नाही. तसेच ब्लिचमुळे चादरी स्वच्छ निघत असल्याने हॉटेलमध्ये चादरी धुतल्या जात नाहीत.

हा ट्रेन्ड कधीपासून आला ?

हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरी वापरण्याचा एक किस्सा सांगितला जातो. 1990 च्या आधी हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या चादरी वापरल्या जायच्या. त्यावर काही डाग लागले तरी ते दिसून येत नव्हते. त्यानंतर वेस्टिन हॉटेल डिझायनर्सनी एक रिसर्च केला. यामध्ये त्यांनी जाणून घेतले की, लक्झरीच्या नावावर लोकांना काय काय आवडते. त्यावेळी लोकांना स्वच्छता आणि चमक आवडते असे निर्दशनास आले. सर्व्हेमध्ये लोकांनी पांढऱ्या रंगाला अधिक पसंती दिली. त्यानंतर म्हणजे 1990 नंतर अनेक हॉटेलमध्ये पांढऱ्या रांगाच्या चादरी वापरण्याचा ट्रेंनड सुरु झाला.