#YogaDay 2019 : कशी झाली आंतराराष्ट्रीय योग दिवसाची सुरवात ? योग दिवस २१ जुनलाच का ? जाणून घ्या सविस्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : आज जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने झाली आहे. २७ सप्टेंबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत जगभरात एकाच दिवशी योग करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ११ डिसेंबर २०१४ ला हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि आंतराराष्ट्रीय योग दिवस अस्तित्वात आला.

२१ जुनलाच का साजरा केला जातो योग दिवस ?
तुम्ही कधी विचार केलाय का कि २१ जुनलाच योग दिवस का साजरा केला जातो. या मागे देखील एक खास कारण दडलेले आहे. २१ जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवसाला ग्रीष्म संक्राती म्हणून देखील ओळखले जाते. भारतीय परंपरेनुसार ग्रीष्म संक्रातीनंतर सूर्याचे दक्षिणायन सुरु होते. असं सांगितलं जात की, सूर्याचे दक्षिणायन अध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी खूप लाभकारक असते. या कारणांमुळे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

भारताच्या नावावर दोन रेकॉर्ड
२१ जून २०१५ ला पहिला आंतराराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पहिल्या योग दिवशी भारताने दोन शानदार रेकॉर्ड देखील बनवले. या दिवशी पंतप्रधान मोदींनी ३५ हजार लोकांसह दिल्लीतील राजपथ मैदानावर योग केला होता. पहिले रेकॉर्ड ३५,९८५ लोकांसोबत योग करणे आणि दुसरे रेकॉर्ड ८४ देशांच्या लोकांचा सहभाग या कार्यक्रमात होणे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक