‘या’ कारणांसाठी उपयुक्त आहे हेअर ‘स्पा’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हेअर स्पाला एक प्रकरे डी-स्ट्रेस थेरपी मानलं जातं. महिन्यातून एकदा हेअर स्पा केल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. अनेक जण स्पा करण्याविषयी बोलत असतात.पण हेअर स्पा का करायची ? हे कोणाला माहित नसते. ह्या स्पा मुळे नेमकं काय होत असे प्रश्न हे प्रत्येकाला पडत असतो. री-हाइड्रेटिंग थेरेपी केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी मदत करते. हेअर स्पा करण्यासाठी थोडा जास्त खर्च येत असला तरी देखील स्पामुळे तुमची केस गळती कमी होते तसंच कोंडादेखील कमी होतो. आपण जाणून घेऊयात स्पा करण्याचे फायदे

तणावमुक्ती मिळते
हेअर स्पा केल्यानंतर तणावमुक्त आणि फ्रेश वाटतं. स्पानंतर तुमच्या केसांच्या समस्या दूर होतात. हेअर स्पा करणाऱ्यांना हलकं वाटतं.

मुळांना उत्तम प्रकारे तेल मिळतं
हेअर स्पा थेरेपीमध्ये तुमच्या डोक्याला मालिश केल जातं.यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होतं.यामुळे तुमच्या केसांची वाढ योग्यप्रकारे होते. तुमच्या केसांना ऑक्सिजन देण्याच काम देखील केलं जात.

केसांची मुळं स्वच्छ होतात
हेअर स्पाच्या मदतीने केसांच्या मुळांची योग्य प्रकारे सफाई केली जाते. तुमच्या केसातील छोटी छिद्रं आणि धुळीचे कण देखील साफ केले जातात. केसांच्या वाढीसाठी हेअर स्पा महत्त्वाचा आहे.

केसांची मुळं मजबूत होतात
हेअर स्पामुळे तुमच्या केसांची मुळं मजबूत होतात. जर तुमचे केस गळत असतील,घट्ट बांधल्यावर तुम्हाला त्रास होत असेल तर हेअर स्पा करणं गरजेचं आहे. तुमचे केस जास्त गळत असतील तर त्यासाठी हेअर स्पा अधिक फायद्याचं ठरेल. स्पा केल्यानंतर तुमच्या केसांना पोषण मिळतं.