Gold Smuggling In India : ‘या’ कारणांमुळं भारतात वाढतेय सोन्याच्या तस्करीचा ‘गोरख’ धंदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : जुन्या बॉलीवुड चित्रपटांमध्ये नेहमी आपण व्हिलन कधी बोटीतून तर कधी रस्त्याने सोन्याची तस्करी करताना पाहात होतो. त्या काळात चित्रपटांमध्ये व्हिलनचा हा आवडता उद्योग असायचा. परंतु 90 च्या दशकानंतर हा प्रकार थांबला. मात्र, मागील काही वर्षापासून भारतात पुन्हा सोन्याची तस्करी खुप वाढत चालली आहे. तस्करीच्या बाबतीत आपण जगात वरच्या स्थानावर पोहचलो आहोत. तदर वर्षी शेकडो टन सोने अवैध पद्धतीने भारतात येते.

काही दिवसांपूर्वीच केरळात सोने तस्करीप्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवले होते. दुबईच्या दुतावासाची कर्मचारी स्वप्ना सुरेश आणि तिचे साथीदार सोन्याची तस्करी करत होते. सोन्याच्या तस्करीसाठी डिप्लोमॅटच्या सामानाचा वापर केला जात होता. अखेर कोणत्या कारणामुळे देशात पुन्हा एकदा इतक्या मोठ्याप्रमाणात सोन्याची तस्करी वाढत चालली आहे, ते जाणून घेवूयात…

* भारतात सोन्याची किंमत कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजारच्या जवळ पोहचली आहे. मागच्या वर्षी कस्टम ड्यूटीसुद्धा 10 टक्क्यांवरून वाढवून 12.5 टक्के झाली. एवढेच नव्हे, जीएसटी 1 वरून 3 टक्के झाला. त्यावर दागिने बनवण्यासाठी वेगळा जीएसटी द्यावा लागत आहे.

* याउलट 90 च्या दशकात असे नव्हते. आर्थिक सुधारणांपूर्वी सोन्याची तस्करी प्रचंड वाढली होती. आर्थिक सुधारणांनंतर कस्टम ड्यूटी अवघी एक टक्का करण्यात आली. यामुळे सोन्याची तस्करी जवळपास संपुष्टात आली.

* कायदेशीर सोने आयात करणे आणि तस्करीद्वारे आणण्यात फरकाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, एक किलो सोन्यावर 6 लाख रुपयांपर्यंत फायदा कमावला जाऊ शकतो.

* सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात भारत प्रमुख देशांमध्ये आहे. कॅनडाच्या एका एनजीओने मागच्या वर्षी याबाबत एक रिपोर्ट जारी केला होता.

* या रिपोर्टनुसार भारतात 20 हजार टन सोन्याचे खासगी भांडार आहे, ज्यामध्ये सामान्य लोकांपासून मंदिरे सुद्धा सहभागी आहेत.

* जर चीन, अमेरिका आणि यूरोझोनच्या सरकारी सोन्याच्या भंडाराला एकत्र केले, तरी एवढे मोठे भंडार होणार नाही.

* अधिकृत पद्धतीने भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोने आयात करतो. तर भारतात सोन्याची मागणी सुमारे 1000 टन वार्षिक आहे.

* याचा अर्थ प्रत्येक वर्षी भारतात 150 ते 200 टन सोन्याची तस्करी होते. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार देशात होणार्‍या तस्करीतील अवघे 2 टक्के सोनेच कस्टम अधिकारी जप्त करण्यात यशस्वी होता. विशेष म्हणजे बहुतांश सोने दागिन्यांच्या रूपात येते.

* भारतात सुमारे 75 टक्के सोन्याची तस्करी दुबईच्या मार्गे होते. जेथे हे सोने अफ्रीकन देशांतून अवैश पद्धतीने पोहचते.

* सोन्याच्या तस्करीची प्रकरणे कमी प्रमाणात हाती लागतात कारण, संबंधित देशाकडूनच सर्व कागदपत्रं तयार करून दिले जातात.

* याशिवाय, भारताची सीमा सात देशांना लागून आहे आणि तस्कर नेहमी सोने वेगवेगळ्या रूटने देशात आणतात.

* सरकारी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तस्करांनी आता नवीन रूट स्वीकारला आहे. आता चीन, तैवान आणि हाँगकाँगच्या मार्गाने सोने भारतात आणले जात आहे. हे देश ईकॉमर्स मंचाचा वापर सोनं लपवून पाठवण्यासाठी करत आहेत.

* मागील काही वर्षात केरळमध्ये सोन्याच्या तस्करीची प्रकरणे खुपच वाढली आहेत. 2019-20 मध्ये केरळमध्ये कस्टम विभागाने 550 किलो सोने जप्त केले होते, जो एक विक्रम आहे. अशाच प्रकारे 2018-19 मध्ये केरळात 401 किलो सोने जप्त केले होते.