देशात फाशीच्या पहिले का मारला जातो ‘गंगाराम’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारतात कोणत्याही दोषीला फासावर चढवण्यापूर्वी मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. फाशी देण्यापूर्वी फाशीचा दोरखंड पुन्हा एकदा तपासला जातो. नंतर त्या दोरखंडाने एक डमी फाशी दिली जाते, ज्यामध्ये फाशी मिळालेल्या दोषीच्या शरीराच्या वजनापेक्षा दीडपट जास्त वजनाचा डमी पुतळा तयार केला जातो. या पुतळ्याला फासावर लटकवले जाते. डमी यशस्वी झाल्यानंतर तो दोरखंड आणि त्या प्रात्यक्षिकप्रमाणे खरी फाशी दिली जाते. भारतीय कारागृहत सर्वत्र या पुतळ्याचे नाव गंगाराम ठेवले जाते.

फाशीची प्रक्रिया आपल्या डोळ्यांनी पाहणारे पत्रकार गिरिजाशंकर यांनी आपले पुस्तक आंखों देखी फांसी मध्ये लिहिले आहे की, करागृह प्रशासनामध्ये ही परंपरा खुप कालावधी पासून चालत आली आहे. गिरिजाशंकर यांनी 1978 मध्ये रायपुरच्या कारागृहात बैजू नावाच्या एका दोषीच्या फाशीचे रिपोर्टिंग केले होते. हे भारताच्या इतिहासातील एकमेव उदाहरण आहे, ज्यामध्ये फाशी देताना कुणी पत्रकार उपस्थित होता.

गिरिजाशंकर यांनी पुस्तकात म्हटले की, बैजूच्या फाशीसाठी तयार करण्यात आलेल्या या लाकडी पुतळ्याचे नाव होते गंगाराम, जो स्वत: कुठेही जा-ये करू शकत नव्हता. कारण त्याला पाय नव्हते. होते फक्त शीर, हात कापलेले होते, आणि गुडघ्यापर्यंतच पाय होते. मी कारागृह अधीक्षकांना कुतुहलाने विचारले, लाकडाच्या या पुतळ्याचे नाव गंगारामच का ठेवले ? दुसरे नाव का नाही ? ते म्हणाले की, 1968 मध्ये करागृह अधीक्षकपदावर नियुक्ती झाल्यानंतर जेव्हा ते ट्रेनिंगसाठी 2 महिने केंद्रीय कारागृह जबलपुरमध्ये असताना त्यांनीही जबलपुरच्या कारागृह अधिकार्‍यांना हाच प्रश्न विचारला की पुतळ्याचे नाव गंगारामच का ठेवले गेले ? तेव्हा जुन्या अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्हालाही माहित नाही प्रथम कोणी आणि का पुतळ्याचे नाव गंगाराम ठेवले. त्यांच्या अगोदरच्या कारागृह अधिकार्‍यांकडून हेच ऐकले आहे की, भारतवर्षमध्ये एका मृतकासाठी श्रीराम आणि गंगा जलचे विशिष्ट स्थान आहे. शक्यता आहे की, गंगा जलसाठी गंगा शब्द आणि मुक्तीसाठी राम शब्द एकत्र करून गंगाराम झाला असेल. यामुळे अनेक वर्षांपासून लाकडी पुतळ्याचे नाव गंगाराम प्रचलित झाले.

गिरिजाशंकर यांनी पुस्तकात पुढे म्हटले आहे की, कधी हा जळाऊ लाकडाचा मोठा भाग होता, ज्यास कारागृहातील कैद्यांनी तासून तासून पुतळ्याचे रूप दिले. या पुतळ्याच्या कापलेल्या हातांच्या दोन्ही बाजूला मोठे खिळे असून त्यावर रेतीच्या गोण्या अडकवून त्यास फाशी देण्यात येत असलेल्या कैद्याच्या वजनाच्या दीडपट बनविण्यात आले आहे. हाच लाकडाचा पुतळा गंगाराम ट्रायलसाठी उपयोगी येतो, जेव्हा एखाद्या कैद्याला फासावर लटकवायचे असते.

फाशीच्या वेळी 5 लोकच उपस्थित राहू शकतात
फाशीची शिक्षा देतेवेळी फक्त पाचच लोक उपस्थित राहू शकतात. यासाठी विशेष तरतूद आहे. जेल मॅन्युअलनुसार फाशी देताना केवळ पाच लोक बघू शकतात. ज्यामध्ये करागृह अधीक्षक, उप अधीक्षक, आरएमओ, वैद्यकीय अधिकारी आणि मॅजिस्ट्रेट अथवा त्यांचे प्रतिनिधी सहभागी असतात. याशिवाय फाशी झालेल्या दोषीची इच्छा असल्यास त्याच्या धर्माचा कुणीही व्यक्ती म्हणजेच पंडीत, मौलवीसुद्धा उपस्थित राहू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा –