स्वादीष्ट ‘मोमोज’ खाल्ल्याने होऊ शकते शरीराची हानी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रस्त्यावर विक्री होणारे अनेक पदार्थ लोकांच्या आवडीचे असतात. अगदी गर्दी करून त्यावर ताव मारण्यात येतो. समोसे, वडापाव, पाणीपुरी, डोसा, कचोरी, मोमोज, बर्गरच्या गाड्या रस्तोरस्ती आपल्याला दिसतात. चविष्ट असलेले हे पदार्थ सर्व थरातील ग्राहक चवीने खातात. पण, यात काही असे पदार्थ आहेत जे आरोग्यासाठी निकृष्ट आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मोमोज. चविष्ट असलेले मोमोज ला चटणी बरोबर खाणे म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. मात्र, या मोमोज बाबत शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन धक्कादाय आहे. कारण एका संशोधनानुसार या सर्व पदार्थांमध्ये मोमोज हा सर्वात वाईट पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोमोजचा दर्जा आणि त्याबरोबर मिळणारी तिखट चटणी खाल्ल्याने आजारपण येऊ शकते. मोमोजमध्ये गरजेपेक्षा जास्त फिकल मॅटर वापरले जाते. त्यामुळे शरिराची हानी होऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. संशोधनानुसार मोमोज तयार करण्यासाठी ब्लिचिंग मैदा वापरतात. त्यात अनेक केमिकल्सचा वापरही होतो. यामधील मोनोसोडियम ग्लूटामेट हाडांना कमकुवत करते. त्यामुळे नव्र्हस डिसऑर्डरची समस्या उद्भवू शकते.

मोमोजमध्ये वापरली जाणारी पत्तागोबीही चांगली शिजवलेली नसते. चटणी खूपच तिखट असल्याने पाइल्सचा आजार होऊ शकतो. तर नॉनव्हेज मोमोजमध्ये खराब किंवा आधीच मेलेल्या चिकनचे फिलिंग केले जाते. अशा स्थितीत त्यात बॅसिलस सेरस, क्लॉस्टिडियम परफ्रिगेंस, स्टेफिलोकोकस ऑरियस आणि साल्मोनेला बॅक्टेरिया तयार होतात.

फ्राइड किंवा फ्राइड फिलिंग पदार्थांचे ठरावीक वेळेनंतर विघटन होऊ लागते. त्यामुळे त्यात बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. तेलात तळलेले पदार्थ जास्तीत जास्त ६ ते ८ तासांनी खराब होण्यास सुरुवात होते. ते फ्रिजमध्ये ठेवले तर ते १२ तासांपर्यंत टिकतात. या काळानंतर हे पदार्थ खाल्ले तर पोटात कळ येणे, टायफाइड, उलटी, जुलाब, अ‍ॅसिडिटी असे आजार होऊ शकतात.

रस्त्यावरील पर्दांमध्ये खराब पाण्याचा वापर झाल्यास टाइफाइडचा धोका वाढतो. त्यामुळे आतड्यांना छिद्र पडू शकतात. म्हणजे आतडे फाटू शकतात. तर शौचेच्या वेळी रक्त पडते. शक्यतो बाहेरील पदार्थ टाळावे. स्वच्छता असेल त्याच ठिकाणीच खावे. अनेकदा तेलाचा वापर केला जातो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like