‘मच्छर’ का पितात मानवाचे रक्त ? शास्त्रज्ञांनी सांगितले ‘हे’ हैराण करणारे कारण

न्यू जर्सी : मच्छर रक्त का पितात? त्यांना रक्त पिण्याची सवय कशी लागली? याचे उत्तर शास्त्रज्ञांनी शोधले आहे. शास्त्रज्ञांनी याच्या पाठीमागचे जे कारण सांगितले आहे, ते जाणून तुम्ही हैराण व्हाल. कारण जगाच्या सुरूवातीच्या काळात मच्छरांना रक्त पिण्याची सवय नव्हती.

मच्छरांनी माणसांचे आणि जनावरांचे रक्त पिण्यास सुरूवात केली, कारण ते कोरड्या प्रदेशात राहात होते. जेव्हा हवामान कोरडे असते आणि मच्छरांना आपल्या प्रजननासाठी पाणी मिळत नाही तेव्हा ते माणसांचे आणि जनावरांचे रक्त पिऊ लागतात.

न्यू जर्सीच्या प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी काही काळापूर्वी अफ्रीकेच्या एडीस एजिप्ट मच्छरांचा अभ्यास केला होता. हे तेच मच्छर आहेत, ज्यांच्यामुळे झीका व्हायरस पसरतो. डेंगू आणि पिवळा तापसुद्धा यांच्यामुळेच होतो. न्यू सायंटिस्टमध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, अफ्रीकेच्या मच्छरांमध्ये एडीस एजिप्ट मच्छरच्या अनेक प्रजाती आहेत. सर्व प्रजातींचे मच्छर रक्त पित नाहीत. हे अन्य गोष्टी खाऊन-पिऊन जगतात.

प्रिन्सटन युनिव्हर्सिटीचे संशोधक नोआह रोज यांनी रिपोर्टमध्ये दावा केला होता की, कुणीही अजूनपर्यंत विविध प्रजातीच्या मच्छरांच्या खाण्यापिण्याविषयी संशोधन केलेले नाही. आम्ही अफ्रीकेच्या सब-सहारन रिजनच्या 27 ठिकाणांहून एडीस एजिप्ट मच्छरची अंडी घेतली. या अंड्यातून मच्छरांना बाहेर काढले. नंतर त्यांना माणूस, अन्य जीव असलेल्या गिनी पिग सारख्या लॅबमध्ये बंद डब्यात सोडले. जेणेकरून त्यांचा रक्त पिण्याचा पॅटर्न समजावा. एडीस एजिप्ट मच्छरांचे वेगवेगळ्या प्रजातीच्या मच्छरांपेक्षा खाणेपिणे वेगळे असल्याचे दिसून आले.

नोआह यांचे म्हणणे होते की, हे एकदम खोटे ठरले की, सर्व मच्छर रक्त पितात. झाले असे की, ज्या भागात दुष्काळ आणि गरमी जास्त असते, पाणी कमी असते, तेथे मच्छरांना प्रजननासाठी ओलाव्याची गरज भासते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी मच्छर माणसांचे आणि अन्य प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरूवात करतात.

मच्छरांमध्ये हा बदल अनेक हजार वर्ष अगोदर झाला आहे. एडीस एजिप्ट मच्छरांची खास बाब ही आहे की, ते वाढत्या शहरांमुळे पाणी टंचाईला तोंड देऊ लागले. तेव्हा त्यांना माणसाच्या रक्ताची गरज भासू लागली.

परंतु, जेथे माणसं पाणी जमा करतात, तेथे अनोफिलीस मच्छरांना (मलेरियाचा डास) काहीही अडचण नसते. ते आपले प्रजनन कूलर, रिकामे नारळ, टायर इत्यादी ठिकाणी करतात. परंतु जशी पाण्याची कमतरता भासू लागते, ते ताबडतोब माणसांचे किंवा अन्य जीवांचे रक्त पिण्यासाठी हल्ला करू लागतात.