home page top 1

‘५० करोड़ की गर्लफ्रेंड’ असं म्हणणं मोदींना शोभतं का ? : काँग्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावेळी भाजप आज आझम खान यांना टार्गेट करत आहे. मात्र त्यांच्यातरी पक्षाचे नेते कुठे धुतल्या तांदुळासारखे आहेत. असे काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी म्हंटले आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांच्याबाबत बोलताना ५० करोड़ की गर्लफ्रेंड असा शब्दप्रयोग केला होता हे त्यांना शोभते का ? असा सवाल करत त्याच वेळी त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. असा टोला त्यांनी लगावला.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान सभेत बोलतांना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जयाप्रदा बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपाच नव्हे तर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका होत होती. इतकेच नव्ह तर, राज्यसभेच्या खासदार सोनल मानसिंग यांनीही महिलांबाबत होत असलेल्या वक्तव्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांबाबत असे बोलले जात असेल तर अशा देशात आपण राहतो याची लाज वाटते असे त्या म्हंटल्या होत्या.

याचदरम्यान, भाजप आज आझम खान यांना टार्गेट करत आहे. मात्र त्यांच्यातरी पक्षाचे नेते कुठे धुतल्या तांदुळासारखे आहेत काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांच्याबाबत बोलताना ५० करोड़ की गर्लफ्रेंड असा शब्दप्रयोग केला होता हे त्यांना शोभते का. खरे तर त्याच वेळी त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते असे काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी म्हंटले आहे.

Loading...
You might also like