भारताशी रेल्वे लिंक तर चीनसोबत रस्ता, आशियाच्या 2 महाशक्तींचं स्वागत का करतंय नेपाळ ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळला आशियातील दोन महासत्ता म्हणजेच भारत-चीन यांच्याशी संतुलित संबंध राखण्याची इच्छा आहे. कारण दोन्ही देशांशी केलेल्या करारांमुळे नेपाळची आर्थिक स्थिती सुधारत आहे. देश नेपाळमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी काळात नेपाळ भारत आणि चीन यांच्यातील दुवा म्हणून उदयास येईल.

चीन – नेपाळ करार –

शनिवारी चेन्नईहून काठमांडूला उड्डाण केल्यानंतर शी जिनपिंग गेल्या 23 वर्षांत नेपाळला गेलेले पहिले चीनचे अध्यक्ष ठरले. त्यांनी रविवारी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये सुमारे 20 करार झाले. यात रस्ता बोगदा तयार करणे आणि तिबेटला जाण्यासाठी रेल्वे जोडणी या करारांचा समावेश आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यातील सर्वात मोठा करार ट्रान्स-हिमालयन कनेक्टिव्हिटी नेटवर्कवर झाला आहे. दोन्ही देशांनी 2.75 अब्ज डॉलर्सचे हे नेटवर्क सुरू करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे नेपाळशी चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) शी जोडेले जाईल. त्याशिवाय काठमांडूला चीन सीमेला जोडण्यासाठी चीन-नेपाळला रस्ता बोगदा मिळणार आहे. याशिवाय रेल्वे नेटवर्कसुद्धा सोयीचे केले जाईल.

नेपाळ -भारत संबंध –

2015 मध्ये नेपाळ-चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या मार्गावर ही बंदी आणणे देखील भारताच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. मधेसी समुदायाने या मार्गाच्या कराराविरोधात सुमारे 6 महिने घटनात्मक निदर्शने केली आणि भारत-नेपाळ सीमा रोखली. ज्यामुळे नेपाळचे बरेच आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान झाले. तत्कालीन नेपाळ सरकारने भारतावर या निदर्शनाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले. काही चढउतारानंतर भारत आणि नेपाळमधील संबंध चांगले झाले. भारत नेपाळमधील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहे. रक्सौल आणि काठमांडू दरम्यान रेल्वे जोडणी तयार झाल्याने भारताने नेपाळच्या ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीननेही इतकी गुंतवणूक केलेली नाही.

जर काठमांडूमध्ये चीन रस्ता बनवित असेल आणि बिहारच्या रक्सौल ते नेपाळची राजधानी अशी रेल्वे जोडणी सुरू झाली तर नेपाळची स्थिती अधिक मजबूत होईल. आगामी काळात नेपाळ भारत आणि चीन यांच्यातील दुवा म्हणून उदयास येईल. नेपाळ सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही केवळ 3 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. स्टॅण्ड अलोन मार्केट म्हणून चीनला नेपाळमध्ये रस नाही. चिनी वस्तूंसाठी मोठी बाजारपेठ असलेल्या भारताच्या उत्तर प्रदेशातील बिहार राज्यांमध्ये चीनला अधिक रस आहे.

ओली यांच्या कार्यकाळात चीनशी नेपाळची जवळीक वाढली आहे. दुसरीकडे, भारतही आपल्या शेजाऱ्यांशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच के.पी. शर्मा ओली यांच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा नेपाळ दौर्‍यावर जाऊन आले आहेत. नेपाळला आशियातील दोन महासत्ता म्हणजेच भारत-चीन यांच्याशी संतुलित संबंध राखण्याची इच्छा आहे.

नेपाळच्या ऊर्जा मंत्रालयाचे प्रेस समन्वयक रोशन खडका यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आमचे सरकार जगभरातील देशांशी मजबूत संबंध निर्माण करण्यात गुंतले आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांशी आमच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये अमेरिका, जपान आणि फ्रान्सचा देखील समावेश आहे. आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नुकतीच अमेरिकेचे सचिव माईक पोंपिओ यांच्याबरोबर यशस्वी द्विपक्षीय बैठक घेतली. नेपाळला आता आपल्या गरजेसाठी एका देशावर अवलंबून राहायचे नाही. आम्हाला पुढे जायचे आहे. आम्हाला इतर देशांशीही संबंध सुधारण्याची इच्छा आहे. सध्या चीन आणि भारत यांच्याशी आमचे मजबूत आणि विशेष संबंध आहेत. शेजारी म्हणून, हे दोघे नेहमीच जवळ आहेत.

नेपाळ भारत आणि चीन दोघांना नेपाळ सारख्याच अंतरावर ठेवत आहे. चीनचे नेपाळशी जवळचे नाते म्हणजे भारत-नेपाळ संबंध कमकुवत झाले असा होत नाही. 2015 मध्ये अर्थातच भारत आणि नेपाळ यांच्यात काही तणाव होता, परंतु संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी परिश्रम घेतले. परिणामी, नेपाळ स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी