सनातनवर हे सरकार बंदी का घालत नाही : माजी मुख्यमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला केली होती. मात्र एखादी संघटना किंवा संस्थेवर बंदी घालायची असल्यास त्यासाठी इतर राज्याचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळे बंदीचा निर्णय राहून गेला. मात्र त्यानंतर झालेल्या हत्या लक्षात घेता. या भाजप सरकारने सनातनवर बंदी का घातली नाही. असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित करीत राज्य सरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेत असून सनातन संस्थेबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी देखील त्यांनी केली.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’573c1802-a48d-11e8-8f2d-a79f9e38377e’]

पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संघटनेबाबत भूमिका मांडली.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात आम्ही सनातनवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली होती.

त्यानंतर डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. या हत्या प्रकरणी खंडेवाल आणि नागोरी ची नावं समोर आली. त्याला काही काळ होत नाही. तोवर रवींद्र तावडे आणि आता सचिन अंदुरे ही अशी नावे समोर येत आहे. नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश हत्या प्रकरण लक्षात घेता. दररोज किंवा दिवसांनी नवीन नाव समोर येत आहे. त्यामुळे मुख्य सुत्रधारापर्यँत पोहचणार कधी आणि या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, राज्यातील विचारवंतांच्या हत्येचा घटनाक्रम लक्षात घेता. सनातनवर या सरकारने लवकरात लवकर बंदी आणवी. अशी मागणी आहे.