31 डिसेंबर पर्यंत PAN ला ‘आधार’कार्डशी लिंक करणं कशासाठी गरजेचं, सरकारनं सांगितली सर्व माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारिख 31 डिसेंबर करण्यात आली आहे. याचे महत्वाचे कारण हे आहे की, यामुळे टॅक्सचोरी कमी होणार आहे. यामुळे सर्वांनी असे करावे अशी मोदी सरकारची इच्छा आहे. असे न केल्यास 1 जानेवारी 2020 पासून तुमचे पॅनकार्ड अवैध मानले जाईल. त्यानंतर तुम्ही आयकर विभागाशी संबंधित एकही काम करू शकणार नाही.

किती कार्ड लिंक झाले
मोदी सरकारने 11 नोव्हेंबर पर्यंत 29 कोटी 30 लाख 74 हजार 520 लोकांचे पॅनकार्ड आधार ला लिंक केले आहेत. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना याबाबतची माहिती दिली आहे.

काय आहे हेतू
यामुळे बनावट पॅनकार्डला आळा बसेल आणि आयकरात केली जाणारी अफरातफरी देखील बंद होईल अशी माहिती ठाकूर यांनी दिली. आयकर नियमानुसार 1961 कलम 139 (1) नुसार प्रत्येक त्या व्यक्तीला जो 01 जुलै 2017 पासून आधार प्राप्त करण्यासाठी पात्र होता त्याला हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

कसे लिंक कराल आधारला पॅन
आपण आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवर रजिस्टर असाल तर, आपण इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तुमची पॅन आधारशी जोडली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी आयटीआर दाखल करताना आपण लिंक केलेले असावे. जर दोन्ही प्रकारची माहिती प्राप्तिकर विभागाकडे उपलब्ध असेल तर ते लिंक केले जाते.

या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती मिळवू शकता
www.incometaxindiaefiling.gov.in यावर लॉगीन करून तुमची माहिती तपासून पहा जर तुमचे आधार आधीच लिंक झालेले असेल तर तुम्हाला याबाबतची माहिती समजेल. यासाठी तुमचा आधार नंबर XXXXXX लिंक आहे असा मेसेज दिसेल. जर तुमचे आधार लिंक नसेल तर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल तो तुम्हाला भरावा लागेल.

तुमचे नाव, जन्म तारीख व इतर महत्वाची माहिती भरल्यानंतर इंटर बटन क्लिक करावे लागेल. जर तुम्ही रजिस्टर युजर नसाल तर तुमच्यकडे आणखी एक पर्याय आहे. आयकर विभागाच्या होमपेजवर एक हायपर लिंक आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही पॅनल आधारशी जोडू शकता. ही आहे ती लिंक – http://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx.

यानंतर लिंकवर क्लिक करा यानंतर एक फॉर्म येईल ज्यामध्ये तुम्हाला माहिती भरावी लागेल. माहिती तीच भरावी जी तुमच्या आधार कार्डवर आहे. त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल – तुमचे आधार कार्ड यशस्वीरीत्या पॅनशी लिंक झाले आहे.

आधार – पॅन लिंक करण्याचे आणखीनही मार्ग आहेत
पॅन सेवा देणाऱ्याला मेसेज पाठविणे – जर आपण आयकर विभागाच्या वेबसाइटवर आधार-पॅन लिंक करण्यास सक्षम नसाल तर इतरही मार्ग आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT ) 29 जून 2017 रोजी एका अधिसूचनेत म्हटले आहे की आपण पॅन-आधार इतर मार्गांनी देखील जोडू शकता.

आपण फक्त एसएमएस पाठवून आपला आधार पॅन लिंक करू शकता. आपल्याला हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवावा लागेल. एसएमएस कसा पाठवायचा ते जाणून घ्या

UIDPAN<स्पेस><12 आकडी आधार नंबर><स्पेस><10 आकडी पॅन नंबर>

समजा तुमचा आधार नंबर 111122223333 आहे आणि पॅन नंबर AAAPA9999Q तर तुम्हाला SMS मध्ये हे लिहावे लागेल: UIDPAN 111122223333 AAAPA9999Q

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/