आधारला PAN कार्ड ‘लिंक’ करणं ‘का’ महत्वाचं ? सरकारनं संसदेत दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 11 नोव्हेंबर पर्यंत मोदी सरकारने 29 कोटी, 30 लाख 74 हजार 520 लोकांचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यामध्ये यश मिळवले आहे. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पाच खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की या मागचा हेतू नकली पॅन कार्ड नाहीसे करणे हा आहे. केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती नंतर मात्र ही मुदत 31 डिसेंबर 2019 इतकी करण्यात आली.

का गरजेचे आले आधार कार्डला पॅन जोडणे
अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की, पॅनचा दुरुपयोग आणि टॅक्स चोरी रोखण्यासाठी पॅन कार्ड आधार सोबत लिंक करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यामुळे नकली पॅन कार्डला सुद्धा आळा बसू शकतो. तसेच आतापर्यंत किती लोकांनी पॅन कार्ड आधाराला जोडले आहे असे अनेक प्रश्न खासदारांकडून विचारण्यात आले होते.

अशा प्रकारे करा आधार कार्डला पॅन लिंक
जर तुम्ही इनकम टॅक्स भरत असाल तर तुमचे आधार कार्ड पॅन सोबत लिंक झालेले असेल. इनकम टॅक्सच्या इ फायलिंग वेबसाईटवर जाऊन www.incometaxindiaefiling.gov.in लॉगिन करा. तुमचा पॅन क्रमांक युजर आयडी असेल पासवर्ड म्हणून तुमची जन्म तारीख टाका. साईटवर लॉगिन होताच प्रोफाइल सेटिंग वर जाऊन त्यावर लिंक आधार वर क्लिक करा.

जर पॅन लिंक असेल तर मिळेल हा संदेश
जर तुमचे पॅन कार्ड आधी आधार कार्डशी लिंक नसेल तर एक फॉर्म तुमच्यासमोर उघडेल यामध्ये तुम्हाला पॅन कार्डच्या हिशोबाने आपली पूर्ण माहिती भरावी लागेल. ज्यामध्ये तुमचे नाव, जन्म तारीख अशा सर्व बाबींचा समावेश आहे.

आधार – पॅन लिंक करण्याचे आणखी देखील आहेत मार्ग
जर तुम्ही आयकर विभागाच्या वेब साईटवरून लिंक करू शकला नाही तर तुम्ही पॅन सर्व्हिस प्रोवायडरला मेसेज करू शकता. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने 29 जून 2017 ला एका नोटिफिकेशनमध्ये सांगितले होते की, तुम्ही इतर मार्गानी देखील पॅन – आधार लिंक करू शकता.

एका मेसेजने सुद्धा ही प्रक्रिया शक्य आहे.तुम्हाला हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवावा लागेल.

UIDPAN<स्पेस><12 आधार नंबर><स्पेस><10 आकडी पॅन क्रमांक>
उदा – समजा तुमचा आधार क्रमांक 111122223333 हा आहे आणि पॅन क्रमांक AAAPA9999Q हा आहे.
तर तुम्हाला अशाप्रकारे मेसेज पाठवावा लागेल
UIDPAN 111122223333 AAAPA9999Q

Visit : Policenama.com