मी खालच्या जातीतला आहे म्हणणारे मोदी ‘तेंव्हा’ का गप्प होते : राज ठाकरे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – माढ्यात मी खालच्या जातीतला आहे म्हणणारे मोदी गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा गप्प का होते. गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. देशात आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात खडकवासल्याजवळील मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माढ्यात झालेल्या सभेत  मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत  या वक्तव्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यात कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत. आहो मोदीजी मग गेल्या ५ वर्षात दलितांना मारहाण झाली तेव्हा तुम्ही गप्प का होते?. तसेच तुमच्याच गुजरातमध्ये, उनामध्ये दलित बांधवाना मारहाण झाली तेव्हा तुम्ही का गप्प होते.? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

इतकेच नव्हे तर, उनामध्ये गाय मारली नव्हती तर, गाय गेल्यावर त्यांची कातडी काढायला ज्यांना बोलावले, त्यांना गोरक्षकांनी मारहाण केली. पण गो हत्येवर मोदींची जर अशी तीव्र भूमिका असेल तर मग त्यांचे अनेक जैन मित्र बीफ एक्स्पोर्टमध्ये आहेत असे नरेंद्र मोदी सांगत होतात ना?  मग नेमकी तुमची भूमिका काय आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, नरेंद्र मोदींनी ५ वर्षांपूर्वी तुम्ही अनेक स्वप्न दाखवली. पण मोदी ५ वर्षानंतर निवडणुकांच्या तोंडावर त्या स्वप्नांनवर बोलायला तयार नाहीत. त्यांना निवडणुकीचा प्रचार दुसरीकडे न्यायचा नाही. त्यांना शहीद जवानांच्या जीवावर मते मागायची आहे. असेही त्यांनी म्हंटले.