‘या’ कारणामुळं प्रकाश आंबेडकरांना नको राष्ट्रवादी ‘बरोबर’

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यांना देखील सोबत घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे.

यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 96 जागांची ऑफर दिली असून यावर वंचित काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी ती ऑफर धुडकावून लावत आपण राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत असल्यास येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करताना त्यांनी म्हटले होते कि, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत असून ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात, त्यामुळे आमचा त्यांना विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. आमची भूमिका आम्ही 31 ऑगस्टनंतर जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आहे कि नाही तसेच त्यांना सोडून आमच्याबरोबर यायचे आहे कि नाही याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अकोल्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, एमआयएम संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले कि, एमआयएमबरोबर आम्ही कायम असून आमची युती होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही एकत्रच असणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like