गुलाबच का आहे प्रेमाचे प्रतीक ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – व्हॅलेंटाइन वीक’ ला आजपासून सुरुवात झाली असून आज ‘रोज डे’ आहे. आतापर्यंत अनेक प्रेमी युगुलांनी या गुलाबाचं साक्षीने प्रेमाच्या शपथ घेतल्या असतील आणि त्या निभावल्याही असतील. तुमचे आई -बाबा,आजी आजोबा, पंजोबा आणि त्यापेक्षाही अधिक पिढ्यांमध्ये या गुलाबाचे महत्व प्रेमाचे प्रतीक आणि इतर गोष्टींकरिता आहे. पण तुम्हाला माहीत आहे का या प्रेमाच्या दुनियेत का आहे गुलाबाला अढळ स्थान ? चला जाणून घेऊया काय आहे गुलाब आणि प्रेमाच Beautiful कनेक्शन.

गुलाब कुठे नाही ? लेखकांच्या लेखात, कवींच्या कवितेत गुलाब आहे. प्रेमाचे प्रतीक असलेल्या ताजमहालच्या भिंतींवर गुलाब आहे. जुन्या काळच्या राजे-महाराजेंच्या हातात गुलाब आहे. दोन निस्सीम प्रेम करणाऱ्या प्रेमिकांच्या हातात गुलाब आहे. हल्लीची पिढीने गुलाबांच्या रंगानुसार लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक,  पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक आणि पांढरा गुलाब शांततेचे प्रतीक असे वर्गीकरण केले आहे. पण इतरही फुले असताना गुलाबलाच का प्रेमाचे प्रतीक मानले जाते ? कारण गुलबाचे फुल रंग, सुगंध आणि सुंदरता याने परिपूर्ण असते. जितके ते सुंदर असते तितकेच कष्ट त्याला उगवण्यासाठी करावे लागते. गुलाबाच्या रोपांची खूप काळजी घ्यावी लागते. मग तुम्ही तुमच्या जवळच्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सहज साधीच सोपी गोष्ट का द्याल ? गुलाब हे इतर फुलांपेक्षा प्रेशिअस असते. जसे तुम्ही ज्या व्यक्तीला गुलाब देणार त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं हे तितकंच खास असते म्हणून हा पूर्वापार चालला गुलाबाचा अट्टाहास.

गुलाबासंदर्भात काही खास गोष्टी

गुलाब हे जीवाष्म प्रमाणानुसार ३५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहे.

गुलाब अनेक काळापासून आपल्यासोबत आहे. गुलाबाचा इतिहास तितकाच रंगीत आहे. पण एक उद्योग म्हणून गुलाबांच्या रोपांची लागवड पाच हजार वर्षांपूर्वी चीन मध्ये सुरु झाली .

रोमन काळात गुलाबाचा उपयोग खासकरून अत्तर आणि औषधे टायर करण्यासाठी केला जात होता.

आजकाल सुंदर दिसण्यासाठी रोज वॉटर चा वापर केला जातो पण पहिल्यांदा १७ व्या शतकात रोज वॉटर कायदेशीररित्या वापरण्यास सुरुवात झाली .