…म्हणून संजू ‘बाबा’ नं मुलगी ‘त्रिशाला’ ला तिची इच्छा असूनही अभिनेत्री होऊ दिलं नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त ही आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकांना माहिती नसेल परंतु त्रिशालाला देखील वडिलांप्रमाणे अ‍ॅक्ट्रेस व्हायचं होतं. परंतु संजू बाबानं यासाठी तिला नकार दिला. एका मुलाखतीत संजय दत्तनं याबाबत खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/p/Btl2CXfgAfb/

संजय दत्त म्हणाला की, “जेव्हा मला कळलं की, तिला अभिनेत्री व्हायचं आहे तेव्हा मी स्पष्ट नकार दिला. माझी इच्छा होती की, तिनं अभ्यासाकडे लक्ष द्यावं. तिनं फॉरेन्सिक सायन्समध्ये चांगलं शिक्षण घेतलं आहे. तिनं त्यातच करिअर करावं असं मला वाटतं. बॉलिवूड अभिनेत्री होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं ते म्हणजे हिंदी. त्यात अमेरिकन भाषेतील हिंदी उच्चार इथे चालणार नाहीत. तिला खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल.” असंही तो म्हणाला.

https://www.instagram.com/p/BrDPKn-g4mY/

Advt.

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. त्रिशालाचं आयुष्य अमेरिकेत गेलं आहे. त्रिशाला एक अभिनेत्री नसली तरी तिनं अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. तिचे अनेक फोटो आतापर्यंत सोशलवर व्हायरल होताना दिसले आहेत. आधी खूप वेगळी दिसणाऱ्या त्रिशालानं आता तिचं वजनही कमी केलं आहे. आता ती खूप स्लिम झाली आहे. त्रिशाला आजही ग्लॅमर आणि हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.

https://www.instagram.com/p/BgiP17oDz5P/

https://www.instagram.com/p/BrE1HOVALjR/

https://www.instagram.com/p/BmVgRCQBH6I/