मोदी सरकारला 150 रुपयांना मिळणारी ‘कोव्हीशील्ड’ लस सामान्यांसाठी 400 ते 600 रुपये का? आदर पूनावाला म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्यात कोरोना लशींचा पुरवठा केंद्र सरकार द्वारे केला जातो. मात्र आता केंद्राने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादक कंपन्यांनी लस पुरवठा करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तर कंपन्यांना एक दर ठरवण्यास सांगण्यात आले आहे. यानुसार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड या कोरोना लशीचा दर ४०० ते ६०० रुपये केला आहे. केंद्र सरकारला १५० रुपयाला लस दिली जाते. तीच लस सर्वसामान्याना एवढी महाग का दिली जाते? यावरून सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी माहिती दिली आहे.

आदर पूनावाला म्हणाले, सर्वात आधी आपण कोरोना लशीची किंमत १ हजार रुपये ठरवली होती. तीसुद्धा अधिक नव्हती. परंतु, आम्ही १५० रुपयांपर्यंत दर कमी करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला काही राज्यांकडून १ हजार रुपये कोरोना लशीसाठी प्रस्तावही आला. त्यांनी आम्हाला अनुदानही देत होते. मात्र, आम्ही ते नाकारलं आहे. कारण आम्हाला केंद्र सरकारकडून तशी परवानगी नाही. कोरोना लशीची किंमत ठरवण्यापूर्वी आम्ही काही राज्य सरकारशी बोललो आहे. राज्य सरकारला कोरोना लशीचा एक डोस ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना दिला जाणार आहे.

तसेच पूनावाला यांनी सांगितले आहे की, १५० रुपये दराने कोरोना लस देऊन खरंतर आम्ही तोट्यात आहोत. या लशीबाबत अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीशी करार केलेला असल्याने आम्हाला त्यांना नफ्याचा ५० टक्के भाग द्यावा लागत आहे. केंद्र सरकारला आम्ही पूर्वीच ९ ते १० कोटी डोस दिले आहेत. दुसऱ्या करारानुसार आम्ही ११० दशलक्ष डोस देणार आहे. हे लसीचे डोससुद्धा १५० रुपये किमतीनुसारच देणार आहोत. कारण हा करार पूर्वी झाला आहे. तसेच, दुसरं म्हणजे दर वाढवण्याचं आणखी एक कारण म्हणजे अधिकाधिक परदेशी लस उत्पादकांना भारताकडे आकर्षित करणं. भारतात आता अनेक लशी उपलब्ध होतील आणि ही आताची आवश्यकता आहे असे त्यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, आता सर्व सरकारसाठी कोरोना लशींचा दर ४०० रुपयेच आहे. प्रारंभी आम्ही केंद्र सरकारसोबत करार केला त्यानुसार कोरोना लशीची किंमत १५० रुपये होती. आता कोरोना लशीचा नवा टप्पा सुरू होणार आहे. त्यावेळी केंद्र सरकारसाठी ही किंमत ४०० रुपयेच असेल. एवढी किंमत असली तरी आम्ही जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस देत आहोत. असे आदर पुनावाला यांनी नमूद केले आहे.