‘त्या’ वक्तव्याचे पवारांनी स्पष्टीकरण का दिले नाही ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल डीलप्रकरणी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण का दिले नाही, असा सवाल उभा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधानांवर होत असलेल्या सर्व आरोपांवर पंतप्रधानांवर संशय नाही असे म्हटले तर या प्रकरणी जो रोष आहे तो निरर्थक असल्याचे वाटते. याचबरोबर पवारांच्या वक्तव्याचा जो निष्कर्श काढला त्यातून दिसून आले की पंतप्रधानांची बाजू त्यांनी घेतली. त्यांनी पंतप्रधानांना क्लीन चिट दिली. असे म्हणत तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a936869-c3c2-11e8-bf03-b3681abcb05a’]

इतकेच नव्हे तर, पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून असे बोलले जात असेल तर पक्षाची भूमिकाही तीच आहे असे वाटते त्यामुळे राजीनामा दिला आहे, असेही तारिक अन्वर म्हटले. याचबरोबर, वक्तव्याचा विपर्यास केलाय असे वाटत असते तर पवारांनी तेव्हाच स्पष्टीकरण द्यायला हवे होते. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर २४ तास वाट पाहिली, कारण पवार स्पष्टीकरण देतील, असे वाटले होते. पण त्यांचे कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही अन्वर म्हटले.

[amazon_link asins=’B078124279,B0784D7NFX,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2462b321-c3c2-11e8-87c7-235556931ed2′]

विशेष म्हणजे सर्व विरोधक राफेलप्रकरणी एकजूट झाले आहेत, सर्वांना वाटते की या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. पण पवारांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाचे नुकसान झाल्याचेही ते म्हटले. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा ही एक राजकीय चूक होती, असा आरोपही त्यांनी केला.

मात्र शरद पवारांनी राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्र सरकारने विमानांच्या किंमतीचा खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d55af680-c3c2-11e8-a7c8-1bb0958b00c9′]

राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, ठोकून काढू : राजू शेट्टी

अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने शेतकऱ्यांना दुधाचा भाव वाढवून दिला होता. यावेळी सरकारने दूध संघांना अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन दूध संघांनी दुधाला वाढीव भाव दिला. मात्र, सरकारने कबूल केलेले अनुदान अजूनही दूध संघाना दिलेले नाही. १ ऑक्टोबरपासून सर्व दूध संघ दुधाचा भाव कमी करण्याचा विचार करत आहेत. जर दुधाचा भाव कमी झाला, तर तेथून पुढे राज्यातील एकाही मंत्र्याला फिरू न देता स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

अकोले तालुक्यातील इंदोरी येथे आयोजित जिल्हा उस आणि दूध परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा समाजार घेताना शेट्टी यांनी थेट मंत्र्यांना इशाराच दिला आहे. यावेळी शेतकरी नेते दशरथ सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोपळे आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B078124279,B078BNQ313,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1bc36a4-c3c2-11e8-8cfd-c1b061f661e1′]
खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रात इतर कारखाने ऊस उत्पादकांना शेतकरी संघटनेने जाहीर केलेला भाव देतात. मात्र, नगर जिल्ह्यातील साखर सम्राट शासनाने व संघटनेने ठरवून दिलेला भाव ऊसाला देत नाही. त्यामुळे ही ऊस परिषद अकोल्यात घेतली आहे. देशातील २०३ संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देणारे दोन विधेयक तयार करण्यात आले असून, विशेष अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी २८, २९ व ३० नोव्हेंबरला दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे.