Coronavirus : काही लोक रिकव्हरीनंतर पुन्हा का होताहेत कोरोना पॉझिटिव्ह? रिसर्चमध्ये झाला खुलासा, जाणून घ्या

न्यूयॉर्क : जगभरातील शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञ या गोष्टीने हैराण आहेत की, कोरोनातून रिकव्हर झालेले लोक पुन्हा का आणि कसे पॉझिटिव्ह होत आहेत. काही रूग्ण रिकव्हरीच्या काही आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतर पुन्हा कोरोना संक्रमित होत आहेत. समस्या ही आहे की, त्यांच्या शरीरातून लाईव्ह कोरोना व्हायरस मिळत नाही. कोरोना व्हायरसच्या आरएनएचे आयुष्य खुप छोटे असते. हे अवघ्या काही मिनिटांमध्ये मृत होतात. हैराण करणारी बाब ही आहे की मृत झालेल्या आरएनएचा अंश आपल्या डीएनएमध्ये मिळत आहे. ज्यामुळे लोक दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आढळत आहेत.

व्हायटहेड इन्स्टीट्यूट मेंबर आणि एमआयटीमध्ये बायोलॉजी प्रोफेसर रुडोल्फ जॅनिश यांनी खुलासा केला आहे की, रिकव्हरीच्या नंतर लोक पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह का होत आहेत. रुडोल्फ यांचा हा अभ्यास 6 मे रोजी प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झाला आहे.

या स्टडीमध्ये रुडोल्फ यांनी सांगितले की, कशाप्रकारे कोरोना व्हायरसचा आरएनए आपल्या शरीराच्या पेशींच्या जीनोममध्ये जातो. यास रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. असा जीनोम आरएनएसाठी होणार्‍या पीसीआर टेस्टमध्ये आढळतो. केवळ कोविड-19 च असा व्हायरस नाही जो मनुष्यांच्या जीनोममध्ये जातो, तर असे अनेक इतरही व्हायरस आहेत जे हे काम करतात.

आपल्या शरीरात सामान्यपणे 8 टक्के डीएनए असे असतात ज्यांच्यात प्राचीन व्हायरसचे अंश असतात. त्यांना रेट्रोव्हायरस म्हणतात. हे मनुष्यांच्या जीनोममध्ये जोडले जाऊन स्वताचा वंश पुढे वाढवतात. व्हाईट हेड इन्स्टीट्यूटचे पोस्ट डॉक्टोरल फेलो आणि या स्टडीचे पहिले लेखक लिगुओ झांग म्हणतात, की कोरोना काही रेट्रोव्हायरस नाही. त्यास आपला वंश वाढवण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची आवश्यकता नाही. तरीही मनुष्य आणि अनेक सस्तन प्राण्यांत नॉन-रेट्रो व्हायरल आरएनए व्हायरस जीनोमसोबत जाऊन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करताना दिसून आला आहे.

रुडोल्फ म्हणतात की, आम्हाला आमच्या पुढील चाचणीत हे जाणून घ्यायचे आहे की, कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आपल्या डीएनएला चिकटून त्यास महामारीसाठी पुन्हा तयार करत आहे का. यातून मोठ्या कालावधीसाठी कोरोना रूग्णांच्या शरीरात ऑटोइम्यून रिस्पॉन्स निर्माण होत आहेत. यासाठी रूग्णांना पीसीआर चाचणीतून हे जाणून घेतले पाहिजे की, त्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसचा अंश तर उरलेला नाही.