‘सुशांतनं एका महिन्यात बदलले होते तब्बल 50 सिम कार्ड्स’, शेखर सुमनचा ‘गौप्यस्फोट’ !

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काही लोक अजूनही सवाल उपस्थित करताना दिसत आहे. काहींचं म्हणणं आहे की, ही आत्महत्या नाहीच. अभिनेता शेखर सुमनं यानं नेपोटीजम आणि सुशांतबद्दल अलीकडेच आपली प्रतिक्रिया दिली होती. पुन्हा एकदा त्यानं सुशांतच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित केलाय आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

सुशांतनं बदलले सिम कार्ड्स

शेखर सुमनच्या म्हणण्यानुसार, सुशांतनं आत्महत्येच्या एक महिनाअगोदर 50 सिम कार्ड्स बदलले होते. एखादा व्यक्ती तेव्हाच असं करतो जेव्हा त्याला धोका असतो किंवा कोणीतरी त्याला धमकी देत असतं. जो मुलगा रात्रभर पार्टी करतो, सकाळी प्ले स्टेशनवर असतो, यानंतर तो ज्युस पितो तो अचानक आत्महत्या कशी करू शकतो. याशिवाय सुशांतच्या घरी कोणतीही सुसाईड नोट नव्हती. अशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर सुसाईड नोट असती तर ही एक ओपन एंड शट केस असती. म्हणूनच या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे.

घराच्या छताच्या उंचीवर प्रश्न

शेखर सुमननं घराच्या छताच्या उंचीवरून सवाल उपस्थित केले आहेत. त्यानं म्हटलं की, मंबईत छत जास्त उंच नसतं. सुशांतची हाईट 6 फीट होती. अशात त्यानं बेडवर चढून गळफास घेतला ही गोष्ट काही रुचत नाही. जर सुशांतनं त्याच्या कुर्त्यानं फाशी घेतली असती तर निशाण जास्त मोठं असलं असतं. शेखर म्हणतो की, सुशांतचे वडिल अजूनही धक्क्यातच आहेत. ते जास्त वेळ शांतच बसलेले असतात.