Coronavirus : PM Cares या नावानं कशाला हवाय फंड ?

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरससोबत लढा देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोष असताना पीएम केअर नावाने फंड काढण्याची गरजच काय? असा प्रश्न इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे. त्यांनी ट्विट करुन हा प्रश्न विचारला आहे.आपल्या देशावर राष्ट्रीय संकट आहे. अशात पंतप्रधान स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही पंतप्रधान कार्यालयाला प्रश्न विचारले आहेत.

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 424 वर पोहचली आहे. संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या लढ्यासाठी पंतप्रधान निधीसाठी मदत करणार्‍या दानशूर लोकांचीही संख्या वाढते आहे.

मात्र यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी असताना पीएम केअर या नावाने नवा फंड उभारण्याची गरजच काय? असा प्रश्न रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफचे नामकरण पीएम केअर्स असे करावे असा खोचक सल्लाही शशी थरुर यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांना नावे बदलण्याची सवय आहे त्याप्रमाणेच हे नावही बदलावे असेही थरुर यांनी म्हटले आहे.

You might also like