WHO ला ‘कोरोना’ रुग्णांविषयीचे ‘ते’ ट्विट का ‘डिलीट’ करावे लागले, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे जगातील देश चिंतेत असताना, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ट्विटमुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी एक ट्विट केले होते. त्यामध्ये म्हटले होते की, कोरोना रोगापासून बरे झालेल्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज (रोग प्रतिकारक क्षमता) तयार होता त्यामुळे ते दुसऱ्यांदा संसर्गा होण्यापासून सुरक्षित आहेत. याचा कोणताही पुरवा नसल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटनंतर जगभरातील देशांमध्ये खळबळ उडाली, यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ते ट्विट डिलीट केले.

दरम्यान, अशी काही प्रकरणे आहेत ज्यामध्ये कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशी प्रकरणे चीन, दक्षिण कोरिया किंवा जगातील अनेक देशात आढळून आले आहेत. चीनच्या वुहानमधील डॉक्टरांना असे आढळून आले की बऱ्याच प्रकरणांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. परंतु 50 ते 70 दिवसानंतर पुन्हा त्याच रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्विटचा कोट करताना अमेरिका आणि मेरीलँड युनिव्हर्सिटीचे संसर्गजन्य डिलीजचे प्रमुख फहीम यूनस यांनी म्हटले की, लोकांना विनाकारण घाबरू नका. व्हायरल इन्फेक्शनपासून पूर्णपणे बरे झालेले रुग्णही रोग प्रितिकारक होतात. ही रोग प्रतिकारशक्ती महिने ते वर्षापर्यंत टिकून राहू शकते. अशा गोष्टीवरून घाबरून जाण्याची गरज नाही.