‘टॅरिफ’ वाढल्यानंतर ‘बेस्ट’ आहेत ‘पोस्टपेड’ प्लॅन, ग्राहकांना फायदाच – फायदा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दूरसंचार बाजारातील वाढत्या टॅरीफ प्लॅनमुळे लोक निराश झाले आहेत. ग्राहकांना कॉलिंग आणि डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि आयडिया-वोडाफोन यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. परंतु कोणत्याही कंपनीनं पोस्टपेड मध्ये बदल केलेले नाहीत. त्यामुळे आता नवीन टॅरिफ लागू झाल्यानंतर पोस्टपेड प्लॅन घेणं फायदेशीर ठरेल किंवा नाही हे जाणून घेऊयात.

1) एअरटेल –
एअरटेलचा सुरुवातीचा पोस्टपेड प्लॅन 499 रुपयांचा आहे. ज्यात एकूण 75 जीबी डेटा मिळतो. डेटाबद्दल बोलायचं झालं तर पोस्टपेडमध्ये जास्त फायदा आहे. प्रति दिन डेटाचा विचार केला तर रोज 2.5 जीबी डेटा मिळतो. पोस्टपेडमध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शनही मिळत आहे. सोबतच 1 वर्षासाठी झी 5 चंही सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या सुविधा तुम्हाला प्रीपेडमध्ये मिळत नाही.

2) आयडिया –
आयडियाचा 399 रुपयांपासून प्लॅन सुरू होतो. यात तुम्हाला 40 जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग सोबतच एसएमएसचीही सुविधा आहे. यात फोन सिक्योरिटीदेखील मिळते. ओटीटी अ‍ॅपबद्दल बोलायचं झालं तर यात झी 5 आणि इरॉस नाऊ सहित अनेक सब्सक्रिप्शन मिळणार आहेत. जर तुम्ही 499 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा प्लॅन घेतला तर एका वर्षासाठी अमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शनही मिळतं.

3) वोडाफोन –
वोडाफोनच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 40 जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेज मिळतात. तुम्हाला झी 5, वोडाफोन प्लेचंही सब्सक्रिप्शन मिळतं.

पोस्टपेड प्लॅनचे फायदे

प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्हीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटा मिळतो. परंतु पोस्टपेडमध्ये कोणत्याही डेली लिमिट शिवाय डेटा मिळतो. प्रीपेडमध्ये डेटा संपल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची वाट पहावी लागते. पोस्टपेडमध्ये असं काहीच नाही.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/