चटपटीत किंवा तिखट खाल्ल्यानंतर कानातून धूर आणि नाकातून पाणी येतं का ? जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकदा काही चटपटीत किंवा तिखट खाल्ल्यानंतर कानातून धूर म्हणजेच गरम वाफा निघतात आणि नाकातून पाणी येत. कधी कधी डोळ्यातूनही पाणी येत. याचं कारण काय आहे, असं का होतं, हे चांगलं आहे की, वाईट आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात.

केवळ तिखट नाही तर मसालेही जबाबदार

कधी कधी फक्त तो पदार्थ तिखट आहे म्हणून नव्हे तर त्यातील काही मसाल्यांमुळंही असं होत असतं. याशिवाय जेवण तिखट आहे हे माहित नसताना काही लोकांनी त्याचं सेवन केलं तर तेव्हाही असंच घडतं.

असं का होतं ?

तिखट मसाल्यात कॅप्सिअसन नावाचं तत्व असतं. यामुळं जीभ, कान आणि नाकाची जळजळ होते. डोळे किंवा नाकातून पाणी येतं.

शरीर कसं करतं रिअ‍ॅक्ट ?

कॅप्सिअसनमुळंच अनेकांना तिखटाचं सेवन करताना त्रास होतो. याच्या इरिटेशनपासू मुक्ती मिळवण्यासाठी शरीर फाईट करतं. यामुळं शरीरात म्युकस वाढू लागतं. हे म्युकस नाक आणि डोळे यातून बाहेर पडतं. म्हणून नाक आणि डोळ्यातून पाणी येतं.

इंटरनल मेकॅनिजम

जेव्हा कॅप्सिअसनमुळं नाक, जीभ आणि कानात जळजळ होते. तेव्हा शरीरात इंटरनल मेकॅनिजम अॅक्टीव होतं आणि यावर काम करू लागतं. म्हणून तिखटाचं सेवन करताना डोळ्यातून, नाकातून पाणी तर येतचं, यासोबत तोंडात जास्त प्रमाणात लाळ तयार होते.

आरोग्यसाठी नुकसानकारक नाही

कॅप्सिअसनमुळं जर जळजळ होत असली तरी हा मसाला आरोग्यासाठी नुकसानकारक नसतो. यानं मेटाबॉलिजम मजबूत होतं. डोळे आणि नाकातून पाणी आल्यानं अंतर्गत स्वच्छता होते. म्युकल ब्लॉकेज दूर करण्यासाठी अधून मधून अशा पदार्थांचं सेवन करायला हवं.