Corona Vaccination : कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तसेच Covid मधून बरे झाल्यानंतर लगेचच घेऊ नये Vaccine, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. कोरोना लसींबाबत गाईडलाईन्सही जारी करण्यात आली आहे. भारतात लसीकरणाबाबत बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय टेक्नॉलॉजी समूहाकडून (NTAGI) लसीकरणावेळी शिफारस केली गेली. त्यानुसार, कोरोनातून बरे झाल्याच्या 6 महिन्यानंतर कोरोना लस द्यावी, असे म्हटले आहे.

पण त्यामागची कारणे काय आहेत? तर जाणून घ्या…

–  कोरोनाच्या रिकव्हरीदरम्यान नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मिळते. त्यांच्या शरीरात अँटिबॉडीजही त्यांना सुरक्षा देते. त्यामुळे रुग्णाने काही आठवड्यानंतर लस घ्यावी.

–  जर कोरोना टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अशा लोकांनीही कोरोना लस घेण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही कोरोनातून पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही कोरोनाची लस घेऊ नये. जर तुम्ही कोरोनाबाधित असताना लस घेतली तरी फक्त तुम्हालाच नाहीतर लसीकरण केंद्रावर आलेल्या लोकांनाही याचा धोका पोहोचू शकतो.

–  अमेरिकेतील CDC नुसार, जर कोणी लसीचा एकही डोस घेतला नसेल आणि तो संक्रमित झाला असेल तर त्याने लक्षणे दिसल्याच्या किमान 90 दिवसांची प्रतिक्षा करणे गरजेचे आहे. वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी सांगितले, की UK च्या डाटातून समजले की SARS-CoV-2 इन्फेक्शनपासून बनलेली अँटीबॉडी 80 टक्क्यांपर्यंत सुरक्षा देते.

–  डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जेव्हा संक्रमणानंतर शरीरात अँटीबॉडी बनणे सुरु होते तेव्हा लसीतून मिळणारा परिणामसोबत असतो. जेव्हा तुम्ही कोरोना संक्रमित होता, तेव्हा तुमच्या शरीरात अँटीबॉडी निर्मिती होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही लस घेता तेव्हा इम्युन प्रभावी पद्धतीने सक्रीय राहत नाही.

–  याशिवाय भारतात गरोदर महिलांसाठी आत्तापर्यंत कोणतीही गाईडलाईन्स जारी केली गेली नाही. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोना लस दिली जात नाही. कारण त्यावर लसींचा अभ्यास केला गेला नाही. तसेच ज्या लोकांनी दुसरी लसही घेतली आहे. त्यांनी कोरोनाची कोव्हॅक्सिन घेऊ नये.

–  तज्ज्ञांनुसार, कोविशिल्डमध्ये इंग्रीडिएंटपासून अ‍ॅलर्जी आहे. त्या लोकांनी कोविशिल्ड घेऊ नये. याशिवाय ज्या लोकांना कोविशिल्ड घेतल्याने अ‍ॅलर्जी होत असेल तर त्यांनी दुसरी लस घेऊ नये.