जगातील सर्वात ‘पावर’फुल नेते ट्रम्प यांची मुलगी इवांकाला का बदलावा लागला होता ‘धर्म’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून पदावर बसले आहेत तेव्हापासून त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्याबद्दल जगभरात चर्चा सुरू आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतरच इव्हांका ट्रम्प पहिल्यांदा भारतात आल्या होत्या. आता डोनाल्ड ट्रम्पसुद्धा भारतात आले तेव्हा इव्हांका ट्रम्पही त्यांच्यासमवेत भारतात आल्या आहेत. इव्हांकासमवेत तिचे पती जारेड कुशनर देखील आले. ते व्हाइट हाऊसचे ज्येष्ठ सल्लागार देखील आहेत.

अमेरिकेचे आत्तापर्यंतचे सर्व अध्यक्ष प्रोटेस्टंट ख्रिश्चन होते. फक्त जॉन एफ केनेडी एकमेव रोमन कॅथोलिक राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील प्रोटेस्टंट ख्रिश्चनच आहेत. परंतु त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी आपला धर्म बदलला आहे. पण असं का झालं?

इव्हांकाचे पती ज्यू आहेत
खरं तर, इव्हांका ट्रम्प यांचे पती जारेड कुशनर हे ज्यू आहेत. 2009 मध्ये या दोघांचे लग्न झाले. त्याच वेळी इव्हांका ट्रम्प यांनी आपला धर्म बदलून ऑर्थोडॉक्स ज्यू धर्म स्वीकारला. प्रेसबिटेरियन प्रोटेस्टंट ख्रिश्चन म्हणून मोठ्या झालेल्या इव्हांकाने 2009 मध्ये ज्यू धर्म स्वीकारला. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपले नावही बदलले. येल कुशनर असे त्यांनी नाव बदलले. मात्र, इव्हांकानेही धर्म बदलण्याबाबत वेगवेगळी विधाने केली आहेत. त्यांचा धर्म बदलण्याबद्दलच्या एका अहवालात असे म्हटले होते की त्या काही कारणाबद्दल संभ्रमित आहेत. इव्हांका म्हणाल्या की 2009 मध्ये त्यांनी ज्यू धर्मांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर हा धर्म स्वीकारला होता. आपल्या धर्म परिवर्तनाच्या बाबतीत इव्हांका यांचे म्हणणे आहे की हा खूप चांगला अनुभव आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे मिळाले समर्थन
इव्हांकाने एकदा मुलाखतीत सांगितले होते की वडील डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासूनच तिच्या निर्णयाचे समर्थन केले. 2015 मध्ये एकदा ते म्हणाले होते- ‘धर्म बदलण्याचा निर्णय विलक्षण होता. माझा विश्वास आहे की यहुदी धर्म आपल्या कुटुंबियांना अधिक जोडून ठेवतो. आम्ही शुक्रवार, शनिवारी कोणतेही काम करत नाही. फक्त आपल्या कुटुंबासह वेळ घालवतो. आम्ही आमचे फोन देखील आमच्याकडे ठेवत नाही.’ डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याच्या काही दिवसानंतर इव्हांका आणि त्यांच्या पटीने ज्यूंच्या न्यूयॉर्क येथील श्रद्धास्थानास भेट देण्यास गेले होते. 2017 मध्ये हे दोघेही डोनाल्ड ट्रम्पसमवेत इस्राईलच्या अधिकृत भेटीवर देखील गेले होते. इव्हांका या पहिल्या ज्यू आहेत ज्या की अमेरिकन अध्यक्षांच्या कुटूंबाचा भाग आहेत.

इव्हांकाचे पती कोण आहे
इव्हांका यांचे पती जारेड कुशनर सध्या व्हाइट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार आहेत. या व्यतिरिक्त ते गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि प्रकाशनातही जोडलेले आहेत. कुशनरचे वडील चार्ल्स हे अमेरिकेत मोठे बांधकाम व्यावसायिक होते. जारेड सोव्हिएतहून अमेरिकेत आलेल्या निर्वासित ज्यूंच्या कुटुंबातील आहे.

2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्पसाठी डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजी तयार करणारे जारेड होते. इव्हांका आणि जारेड यांच्याकडेही मोठी मालमत्ता आहे. दोघांची मिळून सुमारे 750 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. तसेच सध्याला दोन्ही पती-पत्नी डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या शक्तिशाली अंतर्गत वर्तुळाचा भाग आहेत.

ट्रम्प यांची सर्वात प्रिय मुलगी
डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या सर्व मुलांमध्ये इव्हांका सर्वाधिक आवडतात. बरेच वेळा कुटुंबातील सदस्यांनी हे उघडपणे सांगितले आहे. इव्हांका ही डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या पत्नीपासून जन्माला आलेली मुलगी आहे. इव्हांकाची आई चेकोस्लोवाकियाची रहिवासी होती. ट्रम्प आणि इव्हाना हे 1977 ते 1990 पर्यंत सोबत होते.