आता वाय-फाय सिग्नलनेही होणार विज निर्मिती

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. मोबाईल क्रांतीमुळे इंटरनेट सेवा घराघरांत पोचली आहे. वाय फायच्या माध्यमातून अगदी  सहजरीत्या माहितीचे आदान-प्रदान करता येते. जगाच्या कानाकोपऱ्यांतील घडामोडी अत्यंत वेगाने सर्वत्र पोचतात. या वाय-फायचा वापर विज निर्मिती करण्यासाठी होणार आहे.

अमेरिकास्थित मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी वायफाय सिग्नलच्या मदतीने एक डिव्हाईस चार्ज करून दाखविले. हे संशोधन नेचर या पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वीज निर्मितीचे  तंत्रज्ञान – संशोधकांनी वाय-फाय सिग्नल्सना विजेते परिवर्तीत करण्यासाठी ‘के रेक्टिना 1’ चा वापर केला आहे. हा एक खास प्रकारचा अँटेना असतो. या संशोधनातील माहितीनुसार हा खास प्रकारचा अँटेना ए सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे पकडतो, यामध्ये वायफाय किरणांचा समावेश असतो. हा अँटेना ‘रेक्टिना के टू डायमेन्शियल सेमिकंडक्टर  बरोबर जोडलेला असतो. त्यानंतर ए सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणे सेमिकंडक्टरमधून पार होतात तेव्हा ती डीसी इलेक्ट्रिसिटीमध्ये परिवर्तीत होतात. या विजेमुळे फ्लेक्सिबल डिव्हाईस चार्ज होऊ शकतो. एमआईटीच्या या ‘के टू डायमेन्शियल सेमिकंडक्टरने वाय-फाय सिग्नलचा वापर करून सुमारे ४० मायक्रोवॅट विजेचे उत्पादन केले. लवकरच या वाय-फाय सिग्नलनेही होणार विजेची निर्मिती होणार आहे.

You might also like