पोलार्डने एका ओवरमध्ये मारले 6 षटकार; श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या हॅटट्रिकवर मारला ‘हातोडा’

पोलिसनामा ऑनलाईन, दि. 4 मार्च – क्रिकेटमध्ये कायरन पोलार्डने एका ओवरमध्ये 6 षटकार मारून आपले रोकॉर्ड नावावर केले आहे. त्यामुळे कायरन पोलार्ड त्याच्या खेळीने आणखी चमकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे यापेक्षा चांगले पदार्पण आणि त्यावरील पहिल्या सामन्यात धावा, रेकॉर्ड आणि षटकारांचा पाऊस असू शकतो?, असेच काहीसे अँटीगा येथील कुलीज क्रिकेट स्टेडियममध्ये पहायला मिळाले आहे. या स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या दोन संघात खेळला गेला. अन् त्याच्या पहिल्या सामन्यात हे स्टेडियम कायरन पोलार्डच्या एका ओवरमध्ये 6 षटकारांचे साक्षीदार बनले. पोलार्डने अशा गोलंदाजाच्या ओवरवर षटकार मारले ज्याने याअगोदर हॅटट्रिक केली होती.

श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजया बर्‍याच दिवसानंतर क्रिकेटमध्ये परतला आहे. सामन्याच्या चौथ्या षटकात त्याने शानदार हॅटट्रिक घेतली आणि पुनरागमन संस्मरणीय बनविण्याच्या दिशेने वाटचाल केली. अकिलाने आपल्या हॅटट्रिकमध्ये लुईस, गेल आणि पूरण या टी -20 फलंदाजांची अलगद शिकार केली. अकिलाची हॅटट्रिक पाहिल्यानंतर पुढे आता खेळ संपला… अशाच आशेनं चालल्याचं आढळत होतं. मात्र, श्रीलंकेने विजयाच्या दिशेने पाऊल टाकले होते. कारण, कॅरेबियन संघ 3.1 ओवरनंतर नाबाद 52 धावांवर खेळत होते.

 

 

 

 

11 चेंडूत 38 धावा आणि 6 षटकार : शानदार खेळ
यजमानांचा खरा खेळ कर्णधार म्हणजेच कायरन पोलार्ड क्रीजवर आल्यानंतर सुरू झाला होता. पोलार्डने 11 सामन्यात 11 चेंडूत 345 च्या स्ट्राईक रेटने 38 धावा केल्या. या डावात त्याने केवळ 1 षटकात 36 धावा केल्या. त्याने अकिला धनंजया जरी असले तरीही त्याने गोलंदाज निवडले. अकिला वेस्ट इंडिजच्या सहावी ओवर टाकत होता त्यावेळी कर्णधार कायरन पोलार्डने आपलं शानदार खेळाचं प्रदर्शन करण्यास सुरूवात केली.

 

 

 

 

पोलार्डने असे मारले सहा षटकार :
पहिले षटकार
पोलार्डने गुडघ्यावर बसून गोलंदाज अकिलाचा पहिला चेंडूवर षटकार मारला.

दुसरा षटकार
दुसरा षटकार मारताना अकिलाला पोलार्डच्या स्नायूंची ताकद बघायला मिळाली. पूर्ण ताकद एकवटून पोलार्डने षटकार हाणला.

तिसरा षटकार
पोलार्डने लांबवर षटकार ठोकत षटकारांची हॅटट्रिक पूर्ण केली.

चौथा षटकार
यावेळी अकिलाने थोडासा लांबीचा चेंडू फेकला, जो पोलार्डने पुन्हा हवेत सीमा पार केला आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास पोलार्डने कमी केला.

पाचवा षटकार
पुन्हा एकदा पोलार्डने आपली शक्ती वापरून गोलंदाजच्या डोक्यावरून एक षटकार हाणला.

सहावा षटकार
पोलार्डने मिडविकेटवर षटकार ठोकत युवराज सिंगच्या क्लबमध्ये सामील झाला.

युवराज सिंग आणि गिब्स क्लब येथे पोलार्ड :
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओवरमधील 6 चेंडूत 6 षटकार ठोकणारा वेस्ट इंडीजचा कायरन पोलार्ड हा पहिला खेळाडू आहे. युवराज सिंगनंतर टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात 6 षटकार ठोकणारा पोलार्ड दुसरा खेळाडू आहे. या दोघांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेच्या हर्षेल गिब्सने वनडे क्रिकेटच्या एका ओवरमध्ये 6 षटकार मारले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओवरमध्ये 6 षटकार मारून आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन करणार्‍या खेळाडूंच्या यादीत आता कायरन पोलार्ड देखील सामील झाला आहे.