WI ‘आव्हान’ समोर असताना टीम इंडियाला मोठा धक्का ! ‘या’ खेळाडूवर होणार शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध बांगलादेश या कसोटी सामन्यात भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. कोलकत्यांच्या इडन गार्डनवर टीम इंडियाचा प्रथमच डे नाइट कसोटी सामना खेळला गेला आणि फक्त अडीच दिवसात हा सामना भारतीय संघाने खिशात घातला. भारताने हा सामना एक डाव 46 धावांनी जिंकला. या सामन्यात सलग चार कसोटी सामन्यात विजय मिळवण्याचा विक्रम भारताने आपल्या नावावर केला. परंतू या सामन्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहा दुखापतग्रस्त झाला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.

भारतीय संघ बांगलादेशला धूर चारल्यावर आता 6 डिसेंबरपासून टी – 20 मालिकेत वेस्ट इंडिजशी सामना करेल. परंतू या मालिकेपूर्वी शिखर धवन यांना माघार घेतली आहे. सय्यद मुश्ताक अली या टी – 20 स्पर्धेत धवन देखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे या वेस्ट इंडिजच्या सामन्यात धवनच्या जागी संजू सॅमसनला संघात संधी मिळेल. परंतू त्यानंतर आता बीसीसीआयने माहिती देत जाहीर केले की साहा दुखापतग्रस्त आहे.

साहाल्या बांगलादेशविरोधातील दुसऱ्याच सामन्यात उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय गटाने त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. आज त्याच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर बंगळुरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी त्याला दाखल करण्यात येईल.

बांगलादेश विरोधातील सामन्यात साहाने नवा विक्रम केला आहे. या सामन्यात इशांतच्या गोलंदाजीवर साहाने बंगालदेशच्या महमुदुल्लाहाला याला बाद करण्यासाठी उत्तम झेल घेतला. यामुळे विराट देखील त्यांच्यावर खूश झाला. त्याने घेतलेल्या झेलामुळे त्याचे सर्वत्र कौतूक झाले. परंतू त्यासह त्याने अनोखे शतक देखील साजरे केले. या झेल घेत त्याने शंभर बळी टिपण्याचा विक्रम केला.

डे नाइट सामन्यात साहाने एक पराक्रम केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात इशांतच्या गोलंदाजीवर वृद्धिमानने एक अप्रतिम झेल टिपत बांगलादेशच्या महमुदुल्लाहाला बाद केले. हा झेल पकडल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगलाच खूष झाल्याचे पाहायला मिळाले. साहाने हा अप्रतिम झेल पकडला आणि तो कौतुकाचा धनी ठरला. पण या झेलबरोबर त्याले एक अनोखे शतकही साजरे केले. या झेलसह विकेट्स मागे शंभर बळी मिळवण्याचा पराक्रम साहाने यावेळी केला आहे.

Visit : Policenama.com