Widening Of Old Pune Mumbai Road | बोपोडी येथील 63 मिळकती हटविल्या ! जुन्या पुणे- मुंबई रस्ता रुंदीकरणातील मोठा अडसर दूर
शुक्रवारपासून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात करणार : विकास ढाकणे (अतिरिक्त महापालिका आयुक्त)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Widening Of Old Pune Mumbai Road | बोपोडी (Bopodi) येथील जुना पुणे मुंबई रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला. विविध कारणांमुळे रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणार्या इमारतीसह ६३ घरे आज पाडून महापालिका Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने अवघ्या एका दिवसांत येथील राडारोडा देखिल उचलून नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले असून उद्यापासून (दि.२६) प्रत्यक्षात रस्तारुंदीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. या कारवाई ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत, त्यांना यापुर्वीच भरपाईसह काहींना पर्यायी घरे देखिल देण्यात आली आहेत, अशी माहीती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) यांनी दिली. (Widening Of Pune Mumbai Road)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) हद्दीतील हॅरीस पुलापर्यंतचे (Harris Bridge) पुणे मुंबई रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपुर्वी झाले आहे. परंतू बोपोडी येथे पुणे महापालिकेच्या हद्दीत रस्ता रुंदीत अडथळा ठरणार्या मिळकतींमुळे येथे बॉटल नेक होउन वाहतुकीचा वेग कमी होत होता. यामुळे बोपोडी चौकात वाहतूक कोंडी (Bopodi Chowk Traffic Jam) ही नित्याचीच बाब झाली होती. येथील भूसंपादनासाठी प्रशासन २०१८ पासून पाठपुरावा करत होते. मात्र, नुकसान भरपाई, पर्यायी घरांची मागणीवरून काहीजण न्यायालयात गेल्याने भूसंपादनासह विलंब होत होता. प्रशासनाने रस्ता रुंदीकरणात बाधित होणार्या घर व दुकान मालकांना भरपाई तसेच काहींना पर्यायी घरे दिल्यानंतरही काही मिळकतधारक भूसंपादनास विरोध करत असल्याने रुंदीकरण रखडले होते. (Widening Of Pune Mumbai Road)

दरम्यान, प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आज सकाळी ७ वाजताच पोलिस बंदोबस्तामध्ये येथील चौकातील दुमजली इमारतीसह लगतच्या तब्बल ६३ मिळकती जमीनदोस्त केल्या. या कारवाईसाठी सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode), पालिकेच्या भूमीप्रापण विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपअभियंता दिनकर गोजारे, महींद्रकर, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त खलाटे यांच्यासह ५० अधिकारी, ७५ बिगारी आणि ४५० पोलिस तैनात करण्यात आले होते. या कारवाईमध्ये तब्बल ४ हजार ६०० चौ.मी. जागा ताब्यात घेण्यात आली, अशी माहीती अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी दिली.

ढाकणे यांनी सांगितले, की बोपोडी ते दूध डेअरी पर्यंतच्या खडकी कॅन्टोंन्मेट बोर्डच्या
(Khadki Cantonment Board) हद्दीतील रस्ता रुंदीकरणाचे काम सहा महिन्यांपुर्वी सुरू करण्यात आले आहे.
या पट्टयामध्ये असलेल्या लष्कराच्या तसेच लष्कराने लीजवर दिलेल्या मिळकतींसह खाजगी मिळकतीही ताब्यात घेण्यात आल्या.
येथे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणार्या जुन्या वृक्षांचे रुंदीकरणालगतच पुनर्रोपण करण्यात आले आहे.

बोपोडी चौकातील भूसंपादन झालेल्या जागेपर्यंत रस्ता रुंदीकरण झाले आहे.
मात्र, काही मिळकती ताब्यात नसल्याने बोपोडी चौकातील काम रखडले होते.
आज झालेल्या कारवाईमुळे अगदी उद्यापासूनच येथे रुंदीकरणाचे काम करण्यास सुरूवात करण्यात येणार असून येत्या काही महिन्यांत पुणे महापालिकेच्या हद्दीतील पुणे मुंबई रस्ता प्रशस्त झालेला असेल.
या कारवाईमध्ये ५० अधिकारी व ७५ मजूर सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे ५ पोलिस निरीक्षक आणि २५ अधिका-यांसह सुमारे ४५० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे आणि पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, उपायुक्त महेश पाटील, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, विशेष भूसंपादन अधिकारी शेंडगे, नगरनियोजनच्या सहायक शीतल भिंगारदिवे, औंध क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदीप खलाटे, कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता प्रशांत महिंद्रकर, तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.
Web Title : Widening Of Old Pune Mumbai Road | 63 incomes in Bopodi deleted! Big hurdle in widening old Pune-Mumbai road removed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Maharashtra Politics News | ‘एकनाथ शिंदे गारुडी तर देवेंद्र फडणवीस…’, सापनाथ-नागनाथ टीकेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल
- ACB Demand Case | देशी दारूची विक्री करता अशी विचारणा करून दर महिन्याला एक केस व मासिक हप्ता? पोलिसावर अॅन्टी करप्शनकडून गुन्हा
- New Education Policy | पुढील वर्षी दहावी- बारावी बोर्डाची परीक्षा होणार का नाही?, याबाबत राज्य मंडळाचे अध्यक्षांचे स्पष्टीकरण