जामिनावर सुटलेल्या 4 आरोपींचा विधवा महिलेवर गँगरेप

बस्ती/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – जामिनावर (released Bail) सुटलेल्या चार आरोपींनी गावातील एका विधवा महिलेवर गँगरेप (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (UP) बस्ती जिल्ह्यात घडली आहे. दुबैलिया परिसरात चार जणांनी एका घरात घुसून 40 वर्षीय महिलेवर गँगरेप केला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वीच आपल्या पतीचा खून करून मृतदेह गायब केल्याचा आरोप या महिलेने आरोपींवर केला होता. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 10 डिसेंबर रोजी गावतलेच चार जण विधवा महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित महिलेने त्यांना विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या आणखी एका तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींवर पीडित महिलेने आणखी एक आरोप केला आहे. तिच्या पतीचा खून करुन मृतदेह गायब केल्याची तक्रार तिने यापूर्वीच या आरोपींविरोधात दाखल केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपींची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.