घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. घटस्फोटीत पुरूषांना हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका घटस्फोटीत महिलांच्या तुलनेत अधिक असतो. तसेच ज्या पुरूषांच्या पत्नीचे निधन झाले आहे त्यांना हार्ट अटॅकने मृत्यू येण्याचा धोका ११ टक्के अधिक असतो, असा निष्कर्ष र्मिंघमच्या एस्टन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे.

उत्तर इंग्लंडच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनात तब्बल १८ लाख लोकांना सहभागी करण्यात आले होते. या लोकांना २००० आणि २०१४ दरम्यान हार्ट फेल्युअर किंवा अनियंत्रित हार्टबीटची समस्या होती. अभ्यासकांनुसार, असे घटस्फोटीत पुरूष जे आधीपासूनच अनियंत्रित हार्टबीटच्या समस्येशी लढत आहेत. त्यांना हार्ट फेल्युअर होण्याचा धोका ११ टक्के आणि मृत्युचा धोका १३ टक्के अधिक असतो. तर अनियंत्रित हार्टबीटने पीडित विवाहित पुरूषांना महिलांच्या तुलनेत मृत्युचा धोका केवळ ६ टक्के असतो. या संशोधनात असेही आढळून आले की, अविवाहित पुरूषांमध्ये अविवाहित महिलांच्या तुलनेत हार्ट फेल्युअरचा धोका १३ टक्के कमी असतो. महिला आणि पुरूषांमध्ये हा फरक असण्याचे कारण त्यांच्याकडे असलेली मदत किंवा मदत मागणे हे असू शकते. हार्ट अटॅक, अनियंत्रित हार्टबीट आणि हार्ट फेल्युअर या तिनही स्थिती आयुष्य कमी करतात.

फेसबुक पेज लाईक करा –