Coronavirus : खऱ्या प्रेमापुढे ‘कोरोना’ही हरला ! पत्नीनं आजारी पतीला 55 दिवस लिहिले 45 LOVE ‘लेटर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कितीही मोठी समस्या असली तरी त्याचा टिकाव खऱ्या प्रेमापुढे लागत नाही. कोरोना व्हायरस सारखा महाभयंकर रोग देखील खऱ्या प्रेमापुढे टिकू शकला नाही ही कहाणी आहे एका वृद्ध जोडप्याची. तिच्या पतीला कोरोना विषाणूची लागण झाली. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. शहरात लॉकडाउन असल्याने पत्नी आपल्या पतीला भेटू शकत नाही. पण यावेळी तीने आपल्या नवऱ्याला तब्बल ४५ प्रेम पत्रे लिहिली.

 

चीनच्या हांगझोउ शहरात राहणाऱ्या ८४ वर्षीय हुआंग गुओकीचे ९० वर्षीय पती सन मागील एक वर्षांपासून श्वास घेण्यास समस्या आणि डिमेन्शिया या आजारामुळे हांगझोउच्या दवाखान्यात भर्ती आहेत.

हुआंग त्यांच्या पतीला भेटण्यासाठी रोज हॉस्पिटल मध्ये जात होत्या. त्यांची सेवा करीत होत्या. पण यातच कोरोना व्हायरस मुळे शहर लॉकडाऊन करण्यात आले. लोकांचे घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले. हॉस्पिटलने देखील ICU मध्ये भेटण्यासाठी मनाई केली.

संपूर्ण रुग्णालयातील कर्मचारी त्या दाम्पत्याला ‘आजी हुआंग’ आणि ‘आजोबा सन’ म्हणून संबोधत असत. आजी हुआंग दररोज दुपारी दोन वाजता किवी फळासह सन यांना भेटायला येत असत. सन यांना किवी फळ खूप आवडतात. परंतु 1 फेब्रुवारीपासून लॉकडाउन होते. आजी हुआंग यांच्यापुढे आता काय करायचे असा प्रश्न पडला. आजी हुआंग दररोज रुग्णालयात यायच्या. कोणीही त्यांना रोखले नाही. कारण त्यांचे प्रेम संपूर्ण शहराला ठाऊक होते. त्या दररोज किवी फळ आणि एक पत्र आणत असत आणि आयसीयूच्या बाहेर नर्सकडे देत असत.

तिचे प्रेम व्यक्त करण्यासाठी दादी हुआंगने सर्वात चांगला आणि जुना मार्ग स्वीकारला. या पत्रांमध्ये ती सन यांना सांगते की रोगांशी लढण्यासाठी तुम्ही बलवान असले पाहिजे. मुले आणि नातवंडे सर्व ठीक आहेत. परिचारिका व डॉक्टर जे सांगतात तसे करत रहा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.

मिस्टर सन देखील हॉस्पिटलच्या पलंगावर झोपून आपल्या पत्नीची पत्रे आरामात वाचतात. आणि वाचल्यानंतर ही पत्र सांभाळून ठेवतात. मागील गुरुवारी जेव्हा लॉकडाऊन मागे घेण्यात आला तेव्हा आजी हुआंग हॉस्पिटल मध्ये मिस्टर सन यांना भेटल्या. त्यांना किवी फ्रुट खायला घातले.