जुगारातील डावावर ‘त्यानं’ पत्नीलाच लावलं, हरल्यानंतर चौघांनी ‘तिचे’ कपडे फाडले, पुढं झालं ‘असं’ काही

कानपूर : वृत्तसंस्था – एका दारुड्या नवऱ्याने जुगार खेळताना पत्नीला पणाला लावले आणि हरल्यानंतर मित्रांनीच त्याच्या पत्नीवर अत्याचार  करण्याचा प्रयत्न केला. पत्नीने कसाबसा बचाव करत पोलिसांची मदत मागितली. मात्र पोलिसांनी घरगुती वाद म्हणत त्या मित्रांना सोडून दिले. समाजासाठी लज्जास्पद अशी ही घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये घडली आहे.

कानपूरच्या कल्याणपूर पोलिस स्टेशन भागात राहणाऱ्या एका महिलेचा असा आरोप आहे की , तिचा नवरा एक अमली पदार्थांच्या  व्यसनाधीन आहे आणि 15 तारखेला तो आपल्या मित्रांसह जुगार खेळत होता. जेव्हा त्याचे पैसे संपले तेव्हा त्याने पत्नीला पणाला लावले. त्याच्या मित्राने पत्नीला जुगारात जिंकले तेव्हा त्यांनी  तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने कसा तरी स्वयंपाकघरात जाऊन आपला जीव वाचवला. आणि पोलिसांना १०० क्रमांकावर फोन लावला. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या मित्रांना ताब्यात देखील घेतले. त्यांच्यासोबत  त्या महिलेदेखील फाटलेल्या कपड्यांसहित पोलीस स्टेशनमध्ये नेले. परंतु काही वेळानंतरच या घटनेला पती-पत्नीमधील घरगुती वाद म्हणत त्या मुलांना सोडून दिले.

या प्रकरणाविषयी माहिती देताना  एसपी  संजीव सुमन म्हणाले की ,  चार जणांनी या महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार महिलेने केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जे काही आरोपी आहे त्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल व योग्य कारवाई केली जाईल. तसे त्या महिलेचे नवऱ्याशी असलेले वादही समोर आले आहेत. आतापर्यंच्या त तपासात पतीची भूमिका उघडकीस आली नाही.

Visit – policenama.com 

You might also like