प्रियकरासोबत मिळून पत्नीने धारदार शस्त्राने केली पतीची हत्या

लखनौ : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यात एक गुन्हा उघडकीस आला. या जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळे फासणारी घटना घडली. एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.

मुनेजर नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. ही घटना 2 फेब्रुवारी मध्यरात्री 2 वाजता घडली. पोलिसांनी मुनेजरचा भाऊ निजामुद्दीनसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निजामुद्दीन याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने मुनेजर याच्या पत्नीसोबत मिळून मुनेजरीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली. तसेच या हत्येत मुनेजरच्या पत्नीचाही सहभाग होता.

लखीमपूर खिरीचे पोलिस अधीक्षक विजय ढुल यांनी सांगितले, की 2 फेब्रुवारी रात्री गावात राहणाऱ्या मुनेजर याची हत्या केल्याची माहिती दिली गेली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

तपासात पत्नीचे अनैतिक संबंध उघड

मुनेजर याची पत्नीचे निजामुद्दीन याच्यासोबत अनैतिक संबंध होते. हे समजल्यानंतर मुनेजरला चांगलाच राग आला होता. तसेच मुनेजर आणि आरोपी या दोघांमध्ये पैशांच्या मुद्द्यावरूनही वाद सुरु होता. त्यामुळेच मुनेजरची पत्नी आणि प्रियकराने मिळून मुनेजरची हत्या केली.