पतीचे दुसऱ्याच महिलेशी झेंगाट, पत्नी आणि मुलांनी भरचौकात ठेचून केला खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पतीचे एका दुसऱ्याच महिलेशी झेंगाट जमले. त्यानंतर त्याने तिच्यासोबत संसारही थाटला. मातर् यातून निर्माण झालेल्या प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीने मुलांसह मिळून गजबजलेल्या भर चौकात विटा – दगडांनी ठेचून त्याचा खून केला. हा धक्कादायक थरार नागपूरच्या कोलवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौकात गुरुवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह मुलांना अटक केली आहे.

रविंद्र अडूळकर (वय ५३, रा. झेंडा चौक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविना उर्फ उषा अडूळकर, आणि मुले अक्षय (वय २१), अभिषेक (वय २५) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

रविंद्र अडूळकर याला दारूचे व्यसन होते. झेंडा चौकात त्याची वडीलोपार्जित इमारत होती. त्या इमारतीमध्ये जवळपास १० गाळे होते. तर हे गाळे भाड्याने दिले होते. तर मुलगा याच गाळ्यांमध्ये दुकान चालवत होता. दरम्यान त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे तो तिच्यावर पैसे उडवत होता.

दरम्यान पत्नीने त्याला याचा जाब विचारला होता. तेव्हा त्यांच्या मतभेदातून २०१५ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी त्याच्या या खटल्याची न्यायालयात सुनावणी होती. त्यानंतर तो सायंकाळी घरी आला. तेव्हा तो पत्नीशी वाद घालत होता. त्यामुळे पत्नी आणि २ मुलांनी मिळून त्याच्या डोळ्यात मिरचूपूड टाकली आणि लाठ्या काठ्या आणि दगड विटांनी ठेचून त्याचा खून केला.

Loading...
You might also like