धक्कादायक ! मोबाईल मागितल्याने पत्नीकडून पतीच्या गळ्यावर सुरीने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फोनवर कोणाशी बोलते, तुझा फोन बघू दे असं विचारल्याच्या कारणावरून पत्नीने चक्क पतीच्या गळ्यावर सुरीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश लक्ष्मण रोहकले (३३, रायकर मळा, धायरी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती अविनाश रोहकले (३०) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ एप्रिल रोजी धायरी येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश रोहकले हे कंपनीच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. तर भारती या घरी असतात. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ते कामावरून घरी परतले. त्यावेळी भारती फोनवर बोलत होती. तेव्हा तिला अविनाश यांनी तू फोनवर कोणाशी बोलत आहेस. बघु दे तुझा फोन असं म्हटले. तेव्हा त्याचा राग आल्याने भारती हिने अविनाश यांच्यावर घरातील भाजी कापण्याची सुरी घेऊन गळ्यावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी नातेवाईकांबरोबर चर्चा करून अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे करत आहेत.

Loading...
You might also like