Pune : संतापजनक ! पत्नीनं 4 दारूड्या मित्रांसह सेक्स करण्यास दिला नकार, पतीनं लोखंडी रॉडनं बायकोला केली बेदम मारहाण

उरळी कांचन/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीने (Wife) चार दारुड्या मित्रांसोबत (drunken friends) शय्यासोबत (sleep) करण्यास नकार दिल्याने पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण (beaten) केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन मध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पिडित महिलेचा तिच्या पतीबरोबर दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी पिडित महिलेने (वय-19) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (police Station) पतीविरुद्ध तक्रार दिली आहे.

पोलिसांनी पिडित महिलेच्या तक्रारीवरुन पतीसह त्याचे चार मित्र विशाल माने, तानाजी शिंदे, सूरज कांबळे व करण खडसे (सर्व रा. सहजपूर, ता. दौड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण पाच आरोपींना लागताच ते फरार झाले असून पाचही जणांच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररदार पिडित महिला व तिच्या पतीचे दीड वर्षापुर्वी प्रेमविवाह झाला आहे. पती दौड तालुक्यातील एका कंपनीत कामाला आहे. मात्र, कोरोनाच्या काळात त्याची नोकरी गेल्याने तो मागील सहा महिन्यांपासू घरी असतो. मागील काही दिवसांपासून पती आणि त्याचे चार मित्र हे दारु पिण्यासाठी घरी जमत होते. पंधरा दिवसांपूर्वी दारु पिल्यानंतर पतीने पिडित महिलेला त्याच्या चार मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. यावर तिने नकार देताच पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीने बेदम मारहाण करुन देखील तिने मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास नकार दिला. या घटनेनंतर हे प्रकरण तात्पुरत्या स्वरुपात मिटलं होत.

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पती व त्याचे चार मित्र दारु पिण्यासाठी घरी जमले होते. दारु पिणे सुरु असतानाच पतीने पुन्हा एकदा चार मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. यावेळीही तीने नकार दिल्याने पती आणि चार मित्रांनी पिडित महिलेला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मित्राची पत्नी आपल्यासोबत शय्यासोबत करणार नसल्याचे लक्षात येताच चार मित्र रात्री अकराच्या सुमारास निघून गेले. मित्र घरी जाताच पतीने पुन्हा तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर घर मालकाने मध्यस्ती करत पिडित महिलेची सुटका केली. पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पतीसह त्याच्या चार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like